Download App

PM मोदींनी शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध…”

Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील बडे सेलिब्रिटी आणि इतर नेते यात सहभागी होणार आहेत. देशभरातील वातावरण आधीच राममय झाले आहे. यानिमित्ताने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोशल मीडियावर एकामागून एक राम भजन शेअर करत आहेत. अलीकडेच त्यांनी जुबिन नौटियाल यांच्या राम भजन ‘राम आयेंगे’चे (Ram Ayenge song) कौतुक केले होते. यानंतर आता त्यांनी स्वस्ती मेहुलचे (Swasti Mehul) राम भजन शेअर केले असून या हृदयस्पर्शी गाण्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वस्ती मेहुलच्या राम भजनाचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. हे शेअर करण्यासोबतच त्यांनी लिहिले की, ‘स्वस्ती जीचे हे भजन एकदा ऐकले की ते बराच वेळ कानात गुंजत राहते. ते डोळे अश्रूंनी, मन भावनांनी भरते.’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टने एक गोष्ट उघड केली आहे की, हे राम भजन ऐकून ते मंत्रमुग्ध झाले आणि त्यातील गीत त्यांच्या हृदयाला भिडले. त्याची स्तुती करताना ते थकत नाही.

देशभरात उत्सवाचे वातावरण: पीएम मोदींच्या पोस्टवर लोकांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात आहेत. लोक बरेच व्हिडिओ आणि इतर राम भजन शेअर करत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत लोकांच्या आनंदाला सीमा नाही. पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रियांवरून याचा अंदाज येऊ शकतो. देश केव्हाच राममय झाला आहे.

‘मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध’; CM शिंदेची ग्वाही

अयोध्येत अमृत महाउत्सव साजरा होणार: अयोध्येत रामलला (श्रीराम) यांचा अभिषेक सोहळा एक आठवडा अगोदर सुरू होणार आहे. हे 16 जानेवारीपासूनच सुरू होतील. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे मुख्य विधी पार पाडणार आहेत. सोबतच 14 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अयोध्येत अमृत महाउत्सव साजरा केला जाणार आहे.

एवढेच नाही तर अयोध्येत 1008 हुंडी महायज्ञही आयोजित केला जाणार आहे. यामध्ये हजारो भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे. त्याचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात येत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. त्यात लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

follow us