Download App

स्टार प्लसची नवी मालिका ‘पॉकेट में आसमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिका मालाकार मुख्य भूमिकेत..

: स्टार प्लस वाहिनी आता ‘पॉकेट में आसमान’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत अभिका मालाकार (Abhika Malakar) मुख्य भूमिकेत आहे.

  • Written By: Last Updated:

Pocket Mein Aasman : स्टार प्लस वाहिनी आता ‘पॉकेट में आसमान’ (Pocket Mein Aasman) ही नवी मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत अभिका मालाकार (Abhika Malakar) आणि फरमान हैदर (Farman Haider) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘पॉकेट में आसमान’ या मालिकेत अभिका मालाकार आणि फरमान हैदर अनुक्रमे रुद्राणी (राणी) आणि दिग्विजय या भूमिका साकारताना दिसतील.

‘आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक 2024’ पुरस्कार सोहळा 25 जानेवारीला रंगणार; अशोक राणे, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा होणार गौरव 

‘स्टार प्लस’ वाहिनी आपल्या प्रेक्षकांकरता वेधक आणि स्वारस्यपूर्ण विषयांवरील मनोरंजनपर मालिका सादर करण्यासाठी ओळखली जाते. नात्यांची गुंतागुंत अलवारपणे उलगडणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या भावभावनांना साद घालतात. आता ‘पॉकेट में आसमान’ या मालिकेत राणी या गर्भार युवतीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्यांचा समतोल साधत करिअरमध्ये यशस्वी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा केलेला निर्धार बघायला मिळेल.

बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या अडचणीत वाढ! केरळ न्यायालयाकडून वारंट जारी, काय आहे प्रकरण? 

तिचा नवरा दिग्विजय, तिच्या निर्णयाचे समर्थन करतो खरे, मात्र तिच्यापुढे अशी अट ठेवतो की, तिने एकतर तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे किंवा अपत्याकडे लक्ष पुरवायला हवे. दरम्यान, डॉक्टर बनण्याचा दृढनिश्चय केलेली राणी मग मातृत्व, प्रेम आणि डॉक्टर बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा याचा समतोल कसा साधते, हे या मालिकेत बघायला मिळेल.

राणीचा प्रवास हा तिच्या चिकाटीचा प्रवास आहे, जिथे ती प्रत्येक अडचणीचा दृढनिश्चयाने सामना करते. प्रेमाची, कुटुंबाची आणि करिअरची स्वप्ने साकारताना आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.

या प्रेरक कहाणीशी घर आणि करिअर तितक्याच ताकदीने पेलण्याची तारेवरची कसरत करणाऱ्या आजच्या महिला स्वत:ला रिलेट करू शकतील.

‘पॉकेट में आसमान’ या मालिकेद्वारे अभिका मालाकार ही गुणी अभिनेत्री हिंदी दूरचित्रवाणी वाहिनीवर पदार्पण करत आहे. आपल्या भूमिकेबद्दल मनोगत व्यक्त करताना अभिका म्हणाली, ‘पॉकेट में आसमान’ या मालिकेत मी रुद्राणीची भूमिका साकारणार आहे, जिला प्रेमाने राणी म्हटले जाते. राणी ही एक अशी मुलगी आहे, जिला प्रेम हवं आहे, मातृत्व अनुभवायचं आहे आणि करिअरही करायचे आहे. तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल साधत ध्येय साध्य करण्यासाठी ती कठोर मेहनत करते. ती तिच्या क्षमतेहून कमी स्वीकारण्यास तयार नाही आणि राणी हे सिद्ध करते की, स्त्री एक परिपूर्ण कौटुंबिक जीवन जगू शकते, मातृत्वाचा आनंद व जबाबदाऱ्या पार पाडत ती यशस्वी करिअरही करू शकते.

पुढं ती म्हणाली, खऱ्याखुऱ्या वास्तव जीवनात, मी राणीच्या भूमिकेशी रिलेट करू शकते, कारण, तिच्याप्रमाणेच, मलाही ठाम विश्वास वाटतो की, कुटुंब आणि महत्त्वाकांक्षा या दोन्हींचा समतोल साधणे शक्य आहे. मी यापैकी कोणत्याही एका गोष्टीला निवडून दुसरी नाकारू शकत नाही, मला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. राणीची प्रेरणादायी कथा निःसंशयपणे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, असं अभिका म्हणाली.

follow us