Download App

Ponniyin Selvan 2 box Office Collection: पहिल्या दिवशी चित्रपटाने कमावले ‘तब्बल’ इतके कोटी

  • Written By: Last Updated:

Ponniyin Selvan 2 box Office Collection: ‘पोन्नियिन सेल्वन: २’ (‘PS 2’) २८ एप्रिल दिवशी जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या वर्षी या सिनेमाचा पहिला भाग आला होता, तेव्हापासून चाहते दुसऱ्या भागाची खूप काळ प्रतीक्षा करत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे, हा सिनेमा सिनेमागृहात दाखल झाला आहे. पहिल्या भागाने जगभरात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.


यामुळे सिनेमाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. ऐश्वर्या राय आणि त्रिशाच्या या चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या अंदाजांनुसार, पहिल्या दिवशी ‘PS-2’ने सर्व भाषांमध्ये देशात धयमाकूळ घालत ३२ कोटी रुपये कमावले आहेत. या सिनेमाची सर्वाधिक कमाई तमिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या भागाच्या तुलनेमध्ये पहिल्या भागाने देशात पहिल्या दिवशी ३४ कोटी रुपये आणि जगभरात ८० कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या भागाची कमाई पहिल्याच्या तुलनेत २ कोटी रुपये कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘PS-2’ ने प्रदर्शनाअगोदरच ७.६ कोटी रुपयांची अॅडव्हान्स तिकिटे विकली आहेत.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

पहिल्या भागाची अॅडव्हान्स बूकिंग १६ कोटी रुपयांची झाली होती. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्यामते PS-2 ची तुलना केजीएफ: चाप्टर २ किंवा बाहुबली २ शी करणं योग्य नाही. कारण या दोन्ही सिनेमाच्या दुसऱ्या भागांची चाहत्यांना PS-2 साठी पुरेशी प्रतीक्षा करावी लागलेली नव्हती.

‘पोन्नियिन सेल्वन: २’ मध्ये विक्रम, जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला आणि इतर कलाकार चाहत्यांना दिसून येणार आहेत. हा सिनेमा देशातील तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us