Sampath J: प्रसिद्ध कन्नड अभिनेता संपत जे रामने केली आत्महत्या! ३५ व्या वर्षी कामा अभावी संपवलं जीवन

Kannada Actor Sampath J Ram Passes Away : कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संपत जे रामचे (Sampath J Ram) निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आत्महत्या करत स्वतःच आयुष्य संपवलं आहे. काम मिळत नसल्याने अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२३ रोजी संपत जे रामने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T120846.364

Kannada Actor Sampath J Ram Passes Away

Kannada Actor Sampath J Ram Passes Away : कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संपत जे रामचे (Sampath J Ram) निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आत्महत्या करत स्वतःच आयुष्य संपवलं आहे. काम मिळत नसल्याने अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२३ रोजी संपत जे रामने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील नेलमंगला येथील त्याच्या राहत्या घरात त्यांनी गळफास घेत त्याने आयुष्य संपवले आहे. तसेच संपत हा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे नैराश्येचा सामना करत असल्याचे सांगितले अजात आहे. करिअरमध्ये येणाऱ्या चढ-उतारांमुळे संपत खचत चाला होता.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

कन्नड चित्रपटसृष्टीत चांगले काम मिळत नव्हते आणि या कारणाने संपत जे रामने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे, असे असले तरी अभिनेत्याच्या कुटुंबियांनी मात्र यासंदर्भामध्ये माहिती दिली नाही. अभिनेत्याने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनावर दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतून मोठा शोक व्यक्त केला जात आहे. संपत जे राम हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कन्नडमधील अनेक सिरीयलमध्ये संपतने आपल्या अभिनयाची मोठी छाप सोडली आहे. ‘अग्निसाक्षी’ या सिरीयलच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे.

Exit mobile version