Download App

Surinder Shinda Death: प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन; ६४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Surinder Shinda Passed Away : प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा  (Surinder Shinda) यांचे निधन झाले आहे. सुरिंदर शिंदा यांनी बुधवारी पहाटे लुधियानाच्या डीएमसीएच हॉस्पिटलमध्ये (DMCH Hospital) वयाच्या ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसाखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या अन्ननलिकेचे ऑपरेशन करण्यात आले होते. या ऑपरेशननंतर त्यांच्या शरीरामध्ये इन्फेक्शन वाढत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांना श्वास घेत असताना त्रास होत असल्याचे देखील सांगण्यात आले होते.

सुरिंदर शिंदा हे अनेक दिवसापासून व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना डीएमसीमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. सुरिंदर शिंदा हे पंजाबी संगीत क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. ‘पुत्त जट्टां दे’, ‘जट्टा जियोना मोर’, ‘काहर सिंह दी माउट’ अशी पंजाबी गाणी त्यांची सुपरहिट ठरले आहेत.

तसेच सुरिंदर शिंदा हे प्रसिद्ध पंजाबी गायक कुलदीप माणक यांचे सहकारी होते. त्यांनी दिवंगत अमरसिंह चमकिला यांना संगीतक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नाव कमविले आहे. तसेच सुरिंदर शिंदा यांनी ‘ऊंचा दर बेब नानक दा’ आणि ‘पुत्त जट्टां दे’ यांसारख्या पंजाबी सिनेमामध्ये अभिनेता म्हणून उत्तम काम केले आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

सुरिंदर शिंदा यांचे खरे नाव सुरिंदर पाल धम्मी असे आहे. सुरिंदर शिंदा यांचा जन्म २० मे १९५४ दिवशी पंजाबमधील जालंधर या ठिकाणी झाला आहे. आपल्या हटके आवाजाने त्यांनी पंजाबी संगीत क्षेत्रामध्ये विशेष ओळख निर्माण केल्याचे बघायला मिळाले आहे. सुरिंदर शिंदा यांच्या गाण्यांना चाहत्यांची पसंती मिळत होती. भगवंत मान आणि सुखबीर सिंह बादल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरिंदर शिंदा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags

follow us