Poshter Boyz – 2: प्रतिक्षा संपली! पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘पोश्टर बॉईज 2

poshter boyz 2: २ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पोश्टर बॉईज’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः मोठा धुमाकूळ घातला होता. या सिनेमात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने सिनेमाला मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केल्यामुळे सिनेमा सुपरहिट झाला आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात नव्या ढंगात चाहत्यांच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T113815.021

poshter boyz 2

poshter boyz 2: २ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पोश्टर बॉईज’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः मोठा धुमाकूळ घातला होता. या सिनेमात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने सिनेमाला मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केल्यामुळे सिनेमा सुपरहिट झाला आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात नव्या ढंगात चाहत्यांच्या भेटीला आले आहेत.

अजय मयेकर दिग्दर्शित ‘आले रे पोश्टर बॉईज 2’ (Poshter Boyz – 2) या सिनेमांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘दिसतं तसं अजिबात नसतं, म्हणून जग फसतं’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या सिनेमाने परत एकदा दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar), हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) आणि अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwas Rao) हे बॉईज चाहत्यांना बघायला मिळणार आहेत.

चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले आहे. यावेळी चित्रपटाच्या २५ फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. हा संपूर्ण दादर परिसर यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दीने गजबजलेला होता. ‘आले रे पोश्टर बॉईज २’ चे पोस्टर बघता यामध्ये तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसून येणार आहेत. यामुळे हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी मोठा धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की.


तसेच त्यांच्या हातामध्ये असलेल्या पोस्टरमध्ये ‘फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली’ असे लिहिलेले दिसत आहे. म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, या उक्तीनुसार नेमकी कोणाची फसवणूक होणार आहे का?, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. पोश्टर बॉईज या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने सिनेमात मांडण्यात आला. वेगळे विषय चाहत्यांना आवडतात. यामुळे ‘पोश्टर बॅाईज २’ ही सिनेप्रेमींना आवडेल असा विश्वास सिनेमाच्या संपूर्ण टीमला आहे.

Exit mobile version