श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार, “दाणोलीश्वर” चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच

कोकणभूमीत परमपूज्य असलेल्या श्री साटम महाराज यांची जीवनगाथा पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येत आहे.

Untitled Design   2026 10 12T105614.473

Untitled Design 2026 10 12T105614.473

Poster of the movie “Danolishwar” launched on social media : कोकणभूमीत परमपूज्य असलेल्या श्री साटम महाराज यांची जीवनगाथा पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज’ असं या चित्रपटाचं नाव असून, प्रेक्षकांना अध्यात्माचा परिपूर्ण अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. महाकाली प्रॉडक्शन, स्मिता क्रिएशन यांनी दाणोलीश्वर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत, स्मिता घाग चित्रपटाचे निर्माता, रणजित विठ्ठल चव्हाण सहनिर्माता आहेत.

कमलवल्लभदास यांनी लिहिलेल्या “दाणोलीश्र्वर” या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे. विराज राजे हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. प्राप्त:स्मरणीय सद्गुरु चिटणीस बाबा (डॉ. शशिकांत चिटणीस), प.पू.बाळूमामा दळवी (शिरसंगी) यांच्या आशीर्वादाने व दाणोली समाधी मंदिर ट्रस्ट विश्वस्त कार्यकारी मंडळ, बबी देवळे, श्रीमंत सरकार खेमराज शिवराम राजे सावंत भोसले, दाणोली बाजार तरुण मंडळ यांचे या चित्रपटासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं पुण्यात निधन, लावणी आणि अभिनयातून उमटवला अमीट ठसा

समर्थ शंकर साटम महाराजांचा जन्म 1884 साली अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाला. मुंबईतून एका सामान्य व्यक्तीसारखा सुरू झालेला त्यांचा प्रवास अलौकिक ठरला.भारतभ्रमण करून त्यांची आध्यात्मिक पावले कोकणातील पावन भूमीकडे वळली.सावंतवाडी जवळील दाणोली या गावात महाराजांचा हा दिव्य प्रवास स्थिरावला. सन 1937 पर्यंत त्यांनी आपल्या वास्तव्यात अनेक लीला आणि चमत्कार घडवले. संकटात सापडलेल्या लाखो भाविकांचे प्रपंच सावरून त्यांना सन्मार्ग दाखवला.

आपल्या सहज वागण्यातून समाजाला मानवी जीवनाचे अंतिम सार, मूल्ये शिकवली. दाणोली नगरीत समाधी घेऊन त्यांनी ही भूमी कायमस्वरूपी पावन करून ठेवली. साटम महाराजांची अथांग शिकवण आणि जीवनगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दाणोलीश्वर या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक विराज राजे यांनी सांगितले.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या, कोणत्या अद्याप प्रलंबित?

चित्रपटात कलाकार कोण कोण आहेत? साटम महाराजांची मुख्य भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. आजवर साधू-संत, दैवी शक्ती असलेल्या व्यक्तीमत्त्वांवर मराठीमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले. त्यात आता दाणोलीश्वर साटम महाराजांवरील चित्रपटाची भर पडणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण केलं आहे यात शंका नाही.

Exit mobile version