Download App

Prabhas: अखेर प्रभासचा लग्नाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘पवित्र स्थळी…’

  • Written By: Last Updated:

Prabhas : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमा 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या 10 दिवस अगोदर निर्मात्यांनी सिनेमाचा अॅक्शन ट्रेलर प्रदर्शित (Trailer released) केला आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला श्रीराम ही भूमिका साकारणारा प्रभास (Prabhas), माता सीता ही भूमिका साकारणारी क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान आपल्याला बघायला मिळाला आहे.

या सिनेमाचा प्रदर्शित झालेला हा दुसरा ट्रेलर चर्चेचा विषय ठरला आहे. पण सिनेमातील त्याचा लूक किंवा अॅक्शनची सगळ्यात जास्त चर्चा सुरु नाही, तर त्यानं या वेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्रभासनं तिरुपतीत लग्न बंधनात अडकणार असल्याच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. भाईजान प्रमाणेच प्रभास हा दाक्षिणेतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. यामुळे त्याचे चाहते हे नेहमीच त्याचं रिलेशनशिप (relationship) स्टेटस जाणून घेण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने विचारत असतात.

नेहमीच त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर शांत असणाऱ्या प्रभासने आता यावर वक्तव्य केले आहे. त्याच्या चाहत्यांच्या सततच्या प्रश्नावर प्रभासने आता सडेतोड उत्तर दिले आहे. ‘आदिपुरुष’ च्या या अखेरच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाच्या दरम्यान, एका व्यक्तीने त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता. प्रभास मस्करी करत म्हणाला, मी तिरुपतीत लग्न करणार आहे. दरम्यान प्रभासने हे वक्तव्य केलं तेव्हा तिथे क्रिती देखील उपस्थित होती.

खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. तर प्रभासनं दिलेल्या या उत्तराने तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. ट्रेलर रिलीज होण्याअगोदरच प्रभास तिरूपती मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी प्रभास पारंपारिक पोशाखात दिसला होता. त्यानं मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना पांढऱ्या रंगाची लुंगी आणि शर्ट परिधान केले होते . तर त्याची एक झलक बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

या कार्यक्रमामध्ये प्रभासला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले होते. यावेळी प्रभासने मस्करीमध्ये त्याच्या चाहत्यांना वचन दिले की आतापासून दरवर्षी तो दोन सिनेमा करत जाणार आहे. इतकंच नाही तर शक्य झाल्यास तो तिसऱ्या सिनेमावर काम सुरु करणार आहे. प्रभासच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याला संपूर्ण भारतात ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या सिनेमामुळे लोक मोठ्या प्रमाणात ओळखू लागले आहेत.

या सिनेमामध्ये असलेली प्रभासच्या भूमिकेने सगळ्यांची मने जिंकली होती. दरम्यान प्रभास लवकरच बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर दिसून येणार आहे. या सिनेमाविषयी बोलायचे झाले तर आदिपुरुष या सिनेमाची निर्मिती ही ओम राऊत यांनी केली होती. हा सिनेमा 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे, तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us