Download App

Dharmaveer 2 : ‘धर्मवीर 3’ मध्ये काय असेल? प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला- ‘लोकांना वाटतं…’

Prasad Oak On Dharmveer 2: उत्कृष्ट अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक असलेला प्रसाद ओक 'धर्मवीर 2' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Prasad Oak On Dharmveer 2 Movie: उत्कृष्ट अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक असलेला प्रसाद ओक (Prasad Oak) ‘धर्मवीर 2’ (Dharmveer 2 Movie) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Marathi Movie) आनंद दिघे (Aanand Dighe ) यांची व्यक्तिरेखा साकारून प्रसादने (Prasad Oak) प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सध्या प्रसाद ‘धर्मवीर 2’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसादने अभिनयातील करिअर, ‘धर्मवीर 2’ याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

प्रसादने नुकतचं लेट्स अप मराठी चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात नेमकं काय असणार आहे, याबाबत खुलासा केला आहे. म्हणाला की, ‘पहिल्या इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाण्यासाठी आपण अभ्यास करतो आणि मग दुसरीतून तिसरीत जाण्यासाठी जास्त अभ्यास करतो. त्यानुसार ‘धर्मवीर’च्या भाग 2 आणि भाग 3 बाबत निर्माते, दिग्दर्शकापासून प्रत्येक अभिनेता एकंदरीत आम्ही सर्वानीच खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या दुप्पट प्रतिसाद दुसऱ्या भागाला मिळायला हवा यासाठी आम्ही मोठ्या ताकतीने मेहनत घेतली आहे. आता प्रेक्षकांच्या हातात सर्वकाही आहे, असे प्रसादने म्हटले आहे.


सोबतच ‘धर्मवीर’चा पहिला व दुसरा भाग प्रदर्शित होण्याच्या मधल्या काळात राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये मोठा बदल झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे, या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रसादने सांगितले की, मी याकडे फक्त अभिनेता म्हणून बघतो. दिलेल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं मी महत्त्वाचं समजतो. चित्रपटातून काय संदेश द्यायचा आहे, हा सर्वस्वी लेखक आणि दिग्दर्शकाचा महत्वाचा भाग असतो. पुढे म्हणाला की, आनंद दिघेंची भूमिका साकारताना प्रचंड दडपण आल्याचे प्रसादने सांगितले आहे. अशी भूमिका साकारत असताना प्रचंड दडपण असतं. कारण- आनंद दिघेंना देव मानणारी अनेक कुटुंबं महाराष्ट्र अन् भारतात आहेत. शूटिंगच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो असताना खरोखर मी देव्हाऱ्यात आनंद दिघेंचा फोटो जवळून बघितला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात ही व्यक्ती ज्या उंचीवर आहे, त्या माणसाची भूमिका साकारत असताना ती जबाबदारीने व विचारपूर्वक केली गेली पाहिजे.

चित्रपटातून काय संदेश द्यायचा हा प्रश्न जरी लेखक-दिग्दर्शक यांचा असला तरी भूमिका त्या ताकदीने लोकांसमोर येण्यासाठी मी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. ज्या त्रुटी माझ्याकडून पहिल्या भागात राहिल्या होत्या, त्या ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाच्या निमित्ताने दूर केल्या.” हिंदुत्वाविषयी प्रसाद ओक काय विचार करतो? याबद्दल त्याने सांगितले आहे, “आपल्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे, त्याच्याबद्दल विचार काय करायचा आहे. तो आपला धर्म, प्राण व श्वास असला पाहिजे; जो माझा आहे,” अशी स्पष्टोक्ती प्रसादने दिली आहे.

Marathi Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, ‘या’ दोन चित्रपटामुळे वारं फिरणार?

‘धर्मवीर-2′ चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अपडेट समोर आली आहे .’धर्मवीर-2’ चित्रपटाचा नवा ट्रेलर समोर आला असून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘धर्मवीर-2’ चित्रपट येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या अगोदर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता चित्रपटाला मुहूर्त सापडला आहे.

follow us