Mukkam Post Bombilwadi Movie : ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या चित्रपटामध्ये प्रशांत दामले (Prashant Damle) हिटलरची भूमिका साकारणार आहे. १ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांनी केलंय. ‘कोण होणार हिटलर?’ हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता, त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ (Mukkam Post Bombilwadi) बहुप्रतीक्षित चित्रपटात हिटलर भूमिकेत ज्येष्ठ आणि लोकप्रिय रंगकर्मी श्री प्रशांत दामले आहेत.
परेश मोकाशी यांच्या तीन लागोपाठच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. त्यानंतर परेश मोकाशी यांचा हा चित्रपट असल्यामुळे रसिकांमध्ये मोठी उत्कंठा आहेय ती हिटलरच्या भूमिकेमध्ये (Hitler role) प्रशांत दामले असल्याचे जाहीर झाल्यामुळे आता दुपटीने वाढलीय.
हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. त्यानंतर आता मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी “मु.पो. बोंबिलवाडी” हा चित्रपट घेऊन येत आहेत. यामधील हिटलरच्या भूमिकेत नेमकं कोण आहे? हा लाखमोलाचा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.
Bigg Boss Marathi 5 Winner : मोठी बातमी, सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता
हिटलरचा शोध घेण्यासाठी प्रेक्षकांचा कल घेण्यात आला अन् त्याला भरघोष प्रतिसाद मिळाला. याशिवाय वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांची देखील नावे या स्पर्धेत पुढे होती. मात्र अंतिमतः शिक्कामोर्तब प्रशांत दामले यांच्या नावावर झाला होता. या प्रश्नावरील पडदा अखेर लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी, निर्माते मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्मस्, मयसभा करमणूक मंडळी यांनी आज १६ ऑक्टोबर रोजी हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उघडला.
हिटलरच्या भूमिकेबद्दल प्रशांत दामले म्हणाले की, हिटलर म्हटलं की डोळ्यासमोर एक आकृती -प्रकृती येते. मी माझ्या आयुष्यात असा हिटलर केलेला नाही आणि करणारही नाही. या पात्राला हिटलर का म्हणावं? हा प्रश्न पडावा असं हे पात्र आहे. परेश आणि मधुगंधाबरोबर करायला मिळावे हे महत्वाचे. परेशबरोबर पहिल्यांदाच काम करत असल्याचं दामले म्हणाले आहेत. परेश मोकाशी सोबत पहिल्यांदाच काम करत असल्याचं दामले यांनी म्हटलंय.
Marathi Movie: ‘बाहुबलीच्या ‘कालकेय’ची मराठीत एंट्री, अभिनेता झळकणार मराठी चित्रपटात
चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या की, “आम्ही आत्तापर्यंत जेवढे चित्रपट केले तेव्हा त्यानिमित्ताने आम्ही लोकांना प्रीमियर किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटायचो. तेव्हा लोक परेशला आवर्जून सांगायचे की, तुम्ही ‘बोंबीलवाडी’ नाटक परत आणा. माझंही हे आवडते नाटक आहे, कारण ती एक लाफ्टर राईड आहे. हळूहळू आम्ही या संकल्पनेचे चित्रपटीकरण करून त्याचा चित्रपट करायचा ठरवलं. त्यात आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्याने चित्रपटाचे मूल्य वाढल्याचं कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
हिटलरच्या निवडीबाबत बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की, “आमचा हिटलर कसा असावा? याबाबत चर्चा सुरु होती. हिटलर म्हणजे क्रूर, जगज्जेता, कठोर अशी प्रतिमा आहे. पण नाटकाचा फार्सिकल बाज पाहता, आमचा हिटलर ‘क्युट’ असावा अशी एक टूम निघाली. आता क्युट हिटलर कोण, असा प्रश्न आल्यावर महाराष्ट्रात क्युट म्हणून ज्याची ओळख आहे, असे एकाच नाव पुढे आले आणि ते म्हणजे प्रशांत दामले.
चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे भरत शितोळे म्हणाले की, फिल्म निर्मिती क्षेत्रात आलो. मराठी आणि हिंदी चित्रपट करायचे ठरवले. पण नेमका कोणता चित्रपट करायचा? या विचारात असताना परेशजी आणि मधुगंधाजींनी ‘मु. पो. बोंबीलवाडी’चा विषय सांगितला. कथा ऐकताचक्षणी विवेक फिल्म्सनी या चित्रपटानेच सुरुवात करायला हवी, असं मला वाटलं. त्यानिमित्ताने विवेक फिल्म्स आणि मयसभा एकत्र आलो. परेश मोकाशी आणि मधुगंधाजी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ एवढा हसवतो की, त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो. हे चित्रपट पाहण्याचे कारण आरोग्यदायी असल्याचं भरत शितोळे यांनी म्हटलंय.