Download App

CM शिंदेंसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाले, ‘शेतकऱ्याच्या कुटुंबातून…’

Pravin Tarde Special Post: मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे नाव आज मनोरंजन क्षेत्रात मोठ्या आदराने घेतलं जातं. आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते कायमच चर्चेत असतात. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेंनी खास पोस्ट शेअर केल्याचे पाहायला मिळाले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 60व्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेंनी त्यांच्यासोबतचा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः प्रविण तरडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश देसाई पाहायला मिळत आहेत. हा विडिओ एका शेतामधील आहे. या व्हिडिओमध्ये प्रविण तरडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरुणाला शेतीबद्दल सल्ले देत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पुढे तरडे आणि शिंदे शेतात मशागत करत असल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत प्रविण तरडेंनी CM शिंदेंना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=dggmIDYJW3o

‘मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब…तुमच्या आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलेल्या असामान्य माणसाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,” असं पोस्टला त्यांनी कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंटही करत CM एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Shah Rukh Khan: किंग खान ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट’मध्ये PM मोदींसोबत करणार ‘या’ विषयावर चर्चा

दरम्यान, प्रसाद ओकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो येत्या काळात बऱ्याच सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘धर्मवीर 2’ व्यतिरिक्त ‘पठ्ठे बापूराव’, ‘जिलबी’, ‘वडापाव’, ‘महापरिनिर्वाण’ या सिनेमामध्ये झळकणार आहे.

 

follow us