Download App

Aanibaani: लग्न न झालेल्या माणसाची नसबंदी…; प्रवीण तरडेंच्या विनोदी आणीबाणीचा ट्रेलर प्रदर्शित

Pravin Tarde upcoming movie: ‘आणीबाणी’ (Aanibaani Marathi Movie) हा चार अक्षरी शब्द आपण अनेकवेळा ऐकला आहे. आणि तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांच्या काळया आठवणी देखील लगेच आपल्या डोळ्यासमोर येत असतात. (Aanibaani Trailer) त्यामुळे पुन्हा ‘आणीबाणी’ नको अशी भावना असलेल्या जनतेला आता मात्र मनोरंजनाच्या (Entertainment) आणीबाणीला सामोरं गेल्याचे दिसत आहे.

येत्या २८ जुलैला मनोरंजनाची ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे. त्या अगोदरच मनोरंजनाची ही ‘आणीबाणी’ नेमकी काय राहणार आहे? याची एक झलक नुकतीच एका शानदार कार्यक्रमामध्ये दाखविण्यात आली आहे.‘आणीबाणी’ हा मराठी सिनेमा २८ जुलैला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर काम केल्यावर आता रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा महत्वाचा विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप (Dinesh Jagtap) यांनी आणि लेखक अरविंद जगताप यांनी केले आहे.

या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगण्यात आलेली एका गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी रंजक गोष्ट सांगण्यात आली आहे. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ नेमकी कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार ? याची हटके कथा या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

या सिनेमात उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशी मराठीतील या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ मराठी सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

Tags

follow us