ZEE5वर ‘फ्रेम’ चित्रपटाचा प्रीमियर ! कर्तव्य आणि विवेकबुद्धीतील संघर्ष लवकरच झी5 मराठीवर

Frame मराठी ZEE5ने ‘फ्रेम’या आपल्या आगामी ओरिजिनल चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचा प्रीमियर 10 जुलै 2026 रोजी मराठी ZEE5वर होणार आहे.

Frame

Frame

Premiere of movie ‘Frame’ on ZEE5! A conflict between duty and conscience—coming soon : मराठी ZEE5ने ‘फ्रेम’या आपल्या आगामी ओरिजिनल चित्रपटाची घोषणा केली आहे. व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील नाजूक सीमारेषेचा वेध घेणाऱ्या या प्रभावी सामाजिक चित्रपटाच्या कथानकात सतत नैतिक मूल्यांची कसोटी घेण्यात आली आहे. विक्रम पटवर्धन यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फोटो जर्नालिझमच्या माध्यमातून शोकांतिकेचे चित्रण करताना त्यासाठी मोजावी लागणारी भावनिक आणि नैतिक किंमत हा या चित्रपटाचा मध्यवर्ती विषय आहे. चित्रपटाचा प्रीमियर 10 जुलै 2026 रोजी मराठी ZEE5वर होणार आहे.

“फ्रेम” मध्ये काय बघायला मिळणार?

‘फ्रेम’ हा एक प्रभावी सामाजिक चित्रपट असून तो व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील नाजूक सीमारेषेचा वेध घेतो. नैतिकतेची सतत परीक्षा घेणाऱ्या आणि योग्य-अयोग्य यांच्यातील सीमा अनेकदा धूसर होणाऱ्या परिस्थितीचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात आहे. पुण्यातील एका वृत्तपत्राच्या न्यूज रूमच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत अनुभवी छायाचित्र पत्रकार चंदू पानसरे आणि आदर्शवादी नवोदित सिद्धार्थ देशमुख यांच्या प्रवासातून व्यावसायिक कर्तव्य आणि संवेदनशीलता यांच्यातील संघर्ष उलगडला जातो. “आधी फोटो, मग बाकी सगळं” या भूमिकेवर ठाम असलेला चंदू आणि माणुसकी जपत पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करणारा सिद्धार्थ यांच्यातील विचारांचा संघर्ष या चित्रपटाचा गाभा आहे.

‘अल्फा’ Review | YRF Spy Universe ला नवी ‘लेडी सुपरस्पाय’ मिळाली… पण ‘अल्फा’ खरंच Alpha ठरतो का?

विनाशकारी भूकंपामुळे या दोघांच्या परस्परविरोधी विचारांची खरी कसोटी लागते. मृत्यू, विध्वंस आणि जगण्यासाठीच्या संघर्षाने व्यापलेल्या परिस्थितीत ते सापडतात. ढिगाऱ्याखाली दबलेल्या आयुष्यांचे, अपरिमित दुःखाचे आणि आशेचे क्षण कॅमेऱ्यात टिपताना निरीक्षकाची भूमिका आणि प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तीची भूमिका यांच्यातील सीमारेषा हळूहळू धूसर होत जाते. प्रत्येक छायाचित्र टिपायचे की नाही, या निर्णयासोबत त्यांना स्वतःच्या मूल्यांचा पुनर्विचार करावा लागतो. मानवी दुःखाचे साक्षीदार होण्याची आणि त्याचे दस्तावेजीकरण करण्याची भावनिक व नैतिक किंमत त्यांना अनुभवावी लागते.

महाराष्ट्रात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; CMO कडून हेल्पलाईन क्रमांक जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

फ्रेम’वेगळा का ठरतो – एखाद्या घटनेचे वार्तांकन करताना पत्रकार आणि छायाचित्र पत्रकारांसमोर उभ्या राहणाऱ्या नैतिक द्विधा मनःस्थितीचा वेध घेणारी कथा. अनुभवी, कट्टर प्रोफेशनल आणि या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारा नवोदित यांच्यातील विचारसंघर्षाचे प्रभावी चित्रण. छायाचित्रणाच्या माध्यमातून सत्य, जबाबदारी आणि संकटकाळातील माध्यमांची भूमिका यांचा वेध. न्यूजरूमच्या चौकटीपलीकडे जाऊन मथळ्यांमागील आणि ब्रेकिंग न्यूजमागील मानवी भावविश्व उलगडणारी कथा. एखाद्या घटनेचा साक्षीदार राहणे आणि मदतीसाठी पुढे सरसावणे यांमधील निवडीबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर विचार करायला भाग पाडणारा कंटेन्ट. विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भावनिक कथनशैली आणि तीव्र मानवी नाट्याचा प्रभावी मिलाफ. महत्त्वाकांक्षा, नैतिकता, मूल्ये आणि व्यावसायिक जबाबदारी यांचा अत्यंत वैयक्तिक पातळीवर वेध घेणारी कथा

मी माझं काम केलं, नगराध्यक्षांकडूनच अडवणूक… शेवगावच्या पाणी प्रश्नावर आमदार राजळेंचं नगराध्यक्ष मुंढेंकडे बोट

चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणाले “चंदू ही पारंपरिक नायकाची व्यक्तिरेखा नाही. त्यामुळे त्याची भूमिका साकारणे माझ्यासाठी तितकेच रंजक आणि आव्हानात्मक होते. तो आपल्या कामाप्रती अत्यंत समर्पित आहे, तडजोड न करणारा आहे आणि वास्तवाचे दस्तावेजीकरण करणे हेच आपले काम आहे, त्यात हस्तक्षेप करणे नव्हे, असा त्याचा ठाम विश्वास आहे. मात्र चित्रपटभर त्याच्या या धारणांची कसोटी लागते. त्याच्या भूमिकेशी सहमत व्हावे की नाही, याबाबत प्रेक्षकही स्वतःलाच प्रश्न विचारू लागतील.”

सरसकट कर्जमाफीची पुन्हा जोरदार मागणी; पारनेरचे आमदार काशिनाथ दाते म्हणाले, शेतकरी निकषांना कंटाळले

सिद्धार्थची भूमिका साकारणारा अभिनेता अमेय वाघ म्हणाला “सिद्धार्थ ही संवेदनशीलता, आदर्शवाद आणि आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल ठेवताना अनेक तरुण व्यावसायिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा आहे. ‘फ्रेम’मधील त्याचा प्रवास म्हणजे महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारी यांच्यामध्ये संवेदनशीलतेला नेमके कुठे स्थान द्यायचे, याचा शोध आहे. त्याचा संघर्ष आणि त्याच्यासमोर उभे राहणारे निर्णय प्रेक्षकांना नक्कीच भावतील, असा मला विश्वास आहे.”

Exit mobile version