मी माझं काम केलं, नगराध्यक्षांकडूनच अडवणूक… शेवगावच्या पाणी प्रश्नावर आमदार राजळेंचं नगराध्यक्ष मुंढेंकडे बोट
BJP MLA Monika Rajale यांना शेवगावच्या पाणी प्रश्नावर विचारले असता त्यांनी त्याचं खापर नगराध्यक्षांवर शिंदेंच्या पक्षाच्या नगराध्यांवर फोडलं.
BJP MLA Monika Rajale Criticize Shindes Ngaradhyaksh Maya Arun Mundhe for Shevgoan Water Supply Scheme : राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान लेट्सअप मराठीने शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांना शेवगाव पाथर्डीच्या पाणी प्रश्न कायम चर्चेत असतो. मात्र येथील पाणी योजना नेमकी कुठे अडली आहे. असे विचारले असता त्यांनी या पाणी योजनेच्या धिम्म्या गतीने काम होण्याचं खापर नगराध्यक्षांवर म्हणजे भाजपचे पदाधिकारी असलेल्या अरूण मुंढेंच्या पत्नी ज्यांनी भाजपकडू उमेदवारी न मिळाल्याने शिंदेंकडे जात उमेदवारी मिळवली आणि निवडून आल्या आहेत. त्यांच्यावर फोडलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या मोनिका राजळे?
शेवगाव पाथर्डी पैकी पाथर्डीची पाणी योजना जवलपास 70 ते 80 टक्के पूर्ण झालेली आहे. तर शेवगावच्या पाणी योजनेचे काम थोडसं धीम्या गतीने चालू आहे. त्यामुळे शहराला 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. कधीकधी त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. कारण जुनी पाईपलाईन ही 1996 पासूनची आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आता पाणी योजना मंजूर केली आहे. मात्र नगरपरिषदेची निवडणूक आली आणि सत्तांतर झालं त्याठिकाणी वेगवेगळ्या विचारांच्या तीन पक्षांचे नगरसेवक निवडून आले. त्यांनी पहिल्याच बैठकीत त्रुटी दाखवून पाणी योजनेची पीएमसी एजन्सी बदलली. त्यात विसंवाद असल्यााने ठेकेदार काम थोडं हळू हळू करत आहे. तसेच त्या कामात पर्यावरणाच्या बाबतीतल काही परवानग्या मिळणे देखील बाकी आहे. त्यामुळे लोकांना पाणी पुरवठ्याचा प्रचंड त्रास होत आहे.
सरसकट कर्जमाफीची पुन्हा जोरदार मागणी; पारनेरचे आमदार काशिनाथ दाते म्हणाले, शेतकरी निकषांना कंटाळले
तसेच त्यांना विचारले की, नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्याने तुम्ही शिंदेंची भेट घेणार का? यावर राजळे म्हणाल्या की, शिंदे साहेबांनी निधी मंजूर केला आहे. मात्र स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या तील विसंवादामुळे पाणी योजनेत अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना वाटतं योजना चांगली नाही. डीपीआर जुना आणि परिपूर्ण नाही. मात्र मी अगोदरच साांगितलेले आहे की, पाण्यापासून वंचित असलेल्या उपनगरांचा 55 ते 60 किमी सर्व्हे झाला तो मंजूरीसाठी गेलेला आहे. मात्र आहे तेच काम पूर्ण नाही. मग कसं होणार? मात्र पाथर्डीचं काम जवळपास पूर्ण होत आलयं पण शेवगावच्या कामात गती नाही याचं उत्तर नगरपालिकाच देऊ शकेल. मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम केलयं. अजूनही ते काम अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र त्यांना लोकांनी निवडणुकीत जो कौल दिलेला आहे. त्याचा आदर राखून कुणाची आडवणूक न करता काम करणे आपेक्षित असतं पण शेवगाव शहरात ती भूमिका नाही. पक्षीय दृष्टीकोन ठेवून काही नगरसेवकांना काम द्याचचे काहींना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र नगराध्यक्ष हा शहराचा प्रमुख असल्याने त्याने समान न्याय देणं अपेक्षित असतं. प्रशासक असताना आम्ही समान न्याय दिला. मात्र आता भाजपच्या नगरसेवकांना डावलून निधीचं वाटप केलं जात.