Download App

काजोल अन् ट्विंकल झळकणार एकत्र! प्राइम व्हिडिओने रिलीज केला ‘टू मच विथ काजोल आणि ट्विंकल’ चा ट्रेलर

Prime Video ने आज आपल्या आगामी ओरिजिनल टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ चा अत्यंत प्रतीक्षेत असलेला ट्रेलर लॉन्च केला आहे.

  • Written By: Last Updated:

Prime Video Released Trailer of To Much With Kajol and Twincle : भारताच्या सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट डेस्टिनेशनपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी ओरिजिनल टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ चा अत्यंत प्रतीक्षेत असलेला ट्रेलर लॉन्च केला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना त्यांचे आवडते सेलिब्रिटी कोण आहेत, ते कसे आहेत, त्यांच्या करिअरच्या टप्प्यांपासून ते वैयक्तिक किस्स्यांपर्यंत सगळं काही उलगडताना दिसतं. यात धमाल, आठवणी, करिअरच्या निर्णायक क्षणांचा प्रवास, आणि प्रेक्षकांना नेहमीच उत्सुक करणाऱ्या अफवा, लिंकअप्स यांचाही समावेश आहे.

बीडमध्ये ढगफुटीचा कहऱ! पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केलं

या शोमध्ये पहिल्यांदाच काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघी को-होस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्राइम व्हिडिओचं हे नवीन अनस्क्रिप्टेड ओरिजिनल शो बनिजय एशिया यांनी प्रोड्यूस केलं आहे आणि याचा प्रिमिअर २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा शो भारतासह २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये एकाचवेळी रिलीज होणार असून, याचे नवीन एपिसोड दर गुरुवारी स्ट्रीम होतील.

देवाभाऊ हिंदुस्थानच्या आजूबाजूला बघा, नेपाळमध्ये जे घडलं ते आपल्याकडे… पवारांचा इशारा

पहिल्यांदाच होस्टिंग करत असलेली काजोल म्हणाली, “ट्विंकल आणि मी खूप जुने मित्र आहोत, आणि आम्ही एकत्र आल्यावर जे काही गप्पा होतात त्यात एक खास मजा असते – जरा उधळपटीळ, प्रामाणिक आणि खूप हसवणाऱ्या! हेच या शोचं मूळ आहे. इथे आम्ही अगदी मनापासून गप्पा मारतोय, जशा आपल्याला मित्रमंडळींमध्ये बसून मारायला आवडतात. या शोचा फॉर्मॅट पूर्णपणे वेगळा आहे – ना एक सिंगल होस्ट, ना कंटाळवाणे प्रश्न, आणि ना तयारीतले उत्तरं. ‘टू मच’ मध्ये सगळं काही बेधडक आणि बिनधास्त आहे – खऱ्याखुऱ्या गप्पा, हसू आणि अनुभव! आम्हाला वाटतं की प्रत्येक पिढीला हा शो आवडेल.”

बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; धनंजय मुंडेंची मागणी…

ट्विंकल खन्ना, जी को-होस्टच्या भूमिकेत आहे, ती म्हणाली, “मी कायम मानते की सर्वात छान गप्पा त्या असतात ज्या खर्‍या असतात आणि ज्यात विनोदाचा तडका असतो – आणि हाच आहे ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ चा गाभा. या शोमध्ये कुठलेही तयार उत्तरं नाहीत, परिपूर्ण क्षण नाहीत – इथे सगळं स्पॉन्टेनिअस, खऱं आणि थोडं शरारती आहे. आम्ही असे प्रश्न विचारतो जे सगळ्यांना जाणून घ्यायचे असतात – आणि त्यामुळे अगदी रिझर्व्ह असणारे स्टार्स देखील मोकळे होतात. आमच्यासाठी हे मित्रमंडळींशी गप्पा मारण्यासारखं आहे, पण प्रेक्षकांसाठी हे आहे एक संधी – त्यांचे आवडते स्टार्स अगदी रिअल आणि मजेशीर अंदाजात पाहण्याची!”

खेडकर कुटुंबिय झोलकरच? नवा पराक्रम समोर, चतुर्श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल…

या शोच्या गेस्ट लिस्टमध्ये सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट, वरुण धवन, करण जोहर, कृति सेनन, विक्की कौशल, गोविंदा, जान्हवी कपूर आणि इतर बडे बॉलिवूड स्टार्स यांचा समावेश आहे. ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ हा खरंच एक रोलरकोस्टर आहे, जिथे मोकळेपणा, विनोद आणि अनपेक्षित खुलासे यांचं धमाकेदार मिश्रण आहे. या शोमध्ये, सलमान आणि आमिरची भावासारखी केमिस्ट्री करण आणि जान्हवी यांची मजेशीर नोकझोक, आलिया आणि वरुणचा ‘स्टुडंट टू सुपरस्टार’ प्रवास, गोविंदा आणि चंकी पांडे यांचं हसवणारं संवाद, आणि कृति-विक्की सारख्या नव्या पिढीच्या स्टार्सच्या प्रेरणादायी कथा पाहायला मिळणार आहेत.
या शोमध्ये पाहुणे त्यांचा आतला रिअल आणि हटके अंदाज उघड करतायत – जो कदाचित तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.

follow us