देवाभाऊ हिंदुस्थानच्या आजूबाजूला बघा, नेपाळमध्ये जे घडलं ते आपल्याकडे… पवारांचा इशारा

Sharad Pawar यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी मोर्चा घेतला. यावेळी फडणवीसांना नेपाळप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. असं म्हणत इशाराच दिला.

Letsupp (28)

Sharad Pawar Criticize Devendra Fadanvis for Poster and Loan waiver of farmers : शरद पवार यांच्या शरदचंद्र पवार पक्षाने नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा घेतला. यावेळी स्वत: शरद पवार देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकरवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या देवाभाऊ असं लिहित छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्श करतानाच्या फोटो असलेल्या पोस्टरवरून टीकास्त्र सोडलं. तसेच त्यांनी आपल्या देशात आणि राज्यात देखील सरकारने जनतेकडे दुर्लक्ष केल्यास नेपाळप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. असा एक प्रकारे इशाराच दिला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

सरकार शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत नाही. कांद्याला भाव दिला जात नाही. निर्यात केली तर त्यातही केंद्र सरकारने निर्णय त्यावर देखील बंदी घातली. त्यामुळे आम्ही या शेतकऱ्यांच्या मालाला बाव न देणार्‍या सरकारवर दडपण आणलं. देवाभाऊ तुम्ही महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आहात हे तुम्ही दाखवलं. पण छत्रपती वेगळे राजे होते. त्यांनी शेतकऱ्यांना सोन्याचा फाळ असलेला नांगर दिला. शेतकरी उपाशी राहिले तरल देश उपाशी राहिलं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा आदर्श देवाभाऊंचं सरकार घेतील असं आम्हाला वाटत होतं. पण त्यांनी फक्त शिवाजी महाराजांसोबत मोठी-मोठी पोस्टर लावली.

बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; धनंजय मुंडेंची मागणी…

त्यामुळे सरकरने जर सत्तेत असून शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत नसेल तर आपण बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. आपण शशिकांत शिंदे आणि इतर लोक म्हटले त्याप्रमाणे जसं आपल्या शेजारच्या देशांमध्ये झालं आहे. तसं आपल्याकडेही रकाने निकाल लावला नाही जनतेला मदत केली नाही. तर नाशिकचा हा मोर्चा फक्त सुरूवात आहे. सरकारने दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखी मोठा आणि उग्र स्वरूप धारण करेल. देवा भाऊंना माझी विनंती आहे. हिंदुस्थानच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे ते. नोपाळमध्ये गेल्या आठ दिवसांत जे घडलं त्यामुळे राज्यकर्ते गेले. एका भगिनीच्या हाती राज्य देण्यात आलं आहे. यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शिकतील अशी आपेक्षा करतो.

 

follow us