Priya Bapat : …म्हणून लग्नानंतरही मी माहेरचं आडनाव लावते; प्रियाने सांगितलं कारण…

Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयाने नेहमी चाहत्यांची मने जिंकत असते. प्रियाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेक चाहते तिला सोशल मीडियावर (Social media) फॉलो करत असतात. प्रिया ही सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. अनेक वेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर राहते. नुकतीच प्रियाने वडिलांच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T161046.986

Priya Bapat

Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयाने नेहमी चाहत्यांची मने जिंकत असते. प्रियाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेक चाहते तिला सोशल मीडियावर (Social media) फॉलो करत असतात. प्रिया ही सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. अनेक वेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर राहते.

नुकतीच प्रियाने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त (birthday) एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रियाने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टला तिने छानसा कॅप्शन (Caption) देखील दिला आहे,’प्रिय बाबा, आज तुमचा ८१ वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. मी कितीही आईवेडी असले तरी देखील माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त महत्वाचं आहे.


तसेच पुढे पोस्टमध्ये प्रियाने सांगितले आहे की, कोणताही मोठा निर्णय घेत असताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचे मत विचारात घेणारे माझे वडील आहेत. अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व प्रकारचे लाड करणारे माझे वडील आहेत. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंगच्या सेटवर घेऊन जाणारे आणि बी. ए, इकॉनॉमिक्स केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरत असायचे. आणि तरी देखील मला सिनेमा क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे वडील आहेत.

खर म्हणजे खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे येत असायचे. तेव्हा मला पालकाच्या भूमिकेमध्ये पाहायचे. विश्वास आणि जबाबदारी तसेच प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे वडील आहेत. या पोस्टमध्ये प्रियाने लग्नानंतर आडनाव न बदलण्याचं कारण देखील सांगितले आहे.

तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

‘मला खूप जणं विचारत असतात, लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला “प्रिया” म्हटलत आणि “प्रिया शरद बापट” ही ओळख दिली आहे, जी मी आयुष्यभर जपणार असलयाचे तिने यावेळी सांगितले आहे. प्रियाने शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळाली आहे. या सीरिजमध्ये आगामी एपिसोडची चाहत्यांना उत्सुकतेने वाट पाहावे लागत आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटामध्ये प्रिया बापटने अतिशय महत्वाची भूमिका साकारली आहे.

Exit mobile version