Download App

प्रिया बापट नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 90च्या दशकातील थ्रिलरमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत

Priya Bapat Nawazuddin Siddiqui Movie: दिग्दर्शक सेजल शाह दिग्दर्शित आणि विनोद भानुशाली निर्मित 90 च्या दशकातील बहुप्रतिक्षित अनटाइटेड थ्रिलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Thriller Movie ) मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रिया बापट, प्रेक्षकांना 90 च्या दशकातील मोहक युगात परत घेऊन जाणाऱ्या या मनोरंजक कथेत नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


“काकस्पर्श,” “हॅपी जर्नी” आणि “आम्ही दोघी” आणि “सिटी ऑफ ड्रीम्स” या सिनेमातील तिच्या उल्लेखनीय अभिनयाच्या जोरावर सर्वत्र तिचा कायम बोलबाला बघायला मिळत असतो. प्रिया बापट तिच्या अभिनयामध्ये वास्तववाद आणण्यासाठी कायम ओळखली जाते. प्रिया बापट तिच्या या सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेत आहे, ती नवाजुद्दीनसोबत वर्कशॉपही करत आहे.

दिग्दर्शक सेजल शाह सांगितले आहे की, “प्रिया बापटच्या आगमनाने मी रोमांचित झालो आहे. प्रिया एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिने साकारलेल्या प्रत्येक पात्रासाठी ती खुप मेहनत घेत आहे. नवाज आणि प्रियाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूपच ताजी आणि अनोखी आहे.”

प्रिया बापट या सिनेमाबद्दल सांगितले आहे की, ‘ज्या दिवसापासून मी चित्रपटाची कथा ऐकली, त्या दिवसापासून मी या मनोरंजक थ्रिलरचा एक भाग होण्यासाठी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास खूप उत्सुक होते. स्क्रिप्ट खूप मनोरंजक आहे, आणि 90 च्या दशकाच्या सेटिंगमध्ये एक अतिरिक्त स्तर जोडला आहे.

‘शेर बनकर दहाड़ेगा बाजीराव…’; ‘Singham 3’ सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक रिलीज

नवाझुद्दीनसोबत काम करणे म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकण्यासारखे आहे. आणि आम्ही ही मनोरंजक कथा जिवंत करण्यास उत्सुक आहोत.”40 दिवसांच्या शूटिंगसह या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडलिया यांनी लिहिलेली ही स्क्रिप्ट आहे. नाटक आणि नॉस्टॅल्जियाचा रोलर-कोस्टर राईड असणार आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्स द्वारे प्रस्तुत, या शीर्षकहीन थ्रिलरची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, सेजल शाह आणि भावेश मंडालिया यांनी केली आहे.

Tags

follow us