Priyanka Chopra : जागतिक आयकॉन प्रियंका चोप्रा जोनस (The White Tiger, The Bluff, Heads of State) आणि अकॅडमी अवॉर्ड विजेते रसेल क्रो (Nuremberg, आगामी Highlander) हे साय-फाय अॅक्शन थ्रिलर (Bluefly ) ब्लुफ्लाय मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची आज घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन निम्रॉड अँटल (Predators, Stranger Things) करत असून पटकथा डेव्हिड फ्रिजेरिओ (Beast, Land of Bad), विल्यम यूबँक (Underwater, The Signal) आणि कार्लाइल यूबँक (Broke, Muzzle) यांनी लिहिली आहे.
ही घोषणा प्रियंका चोप्रा जोनससाठी आणखी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या घोषणेनंतर करण्यात आली आहे. नुकतीच तिने आगामी सर्व्हायव्हल थ्रिलर Reset ( रिसेट) मध्ये ऑर्लॅंडो ब्लूमसमवेत प्रमुख भूमिका असल्याची घोषणा झाली होती. यावर्षीच्या सुरुवातीला तिने प्राइम व्हिडीओ वरील The Bluff ( द ब्लफ ) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती ज्याने जगभरात क्रमांक 1 वर पदार्पण केले. त्यानंतर इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्यासोबत जागतिक अॅक्शन -कॉमेडी हेड्स ऑफ स्टेट मध्ये स्क्रीन शेअर केली. आगामी एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित अॅक्शन -अॅडव्हेंचर वाराणसी मध्ये प्रियांका दिसणार असून हा चित्रपट 7 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.
या साय-फाय अॅक्शन थ्रिलरचे निर्माते आहेत Polite Society तर्फे मायकेल जेफरसन, Broken Open Pictures तर्फे डेव्हिड फ्रिजेरिओ, G2 Dispatch तर्फे डेबोरा ग्लोव्हर, Highland Film Group तर्फे एरियान फ्रेझर आणि डेल्फिन पेरिए, तसेच व्हेनेसा याओ गुओ. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते लिआ बुमन, गाय डेव्हिस, रुथअॅन फ्रिजेरिओ, ब्रायन कॅव्हनॉ-जोन्स, जेसन क्रिंगस्टाइन, केटी लिअरी आणि स्कॉट लेव्हेन्सन आहेत.
Highland Film Group या चित्रपटाचे जगभरातील वितरण हक्क हाताळत असून TIFF मध्ये विक्रीची अधिकृत सुरुवात करणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण सुरू होणार आहे. काँगोच्या दाट जंगलात घडणाऱ्या या कथेत, दुःखाने ग्रासलेला संयुक्त राष्ट्रांचा एक अनुवादक अशा एका गुप्त ब्लॅक-ऑप्स मोहिमेत ओढला जातो, ज्याचा उद्देश असा कोसळलेला विमान शोधून काढणे असतो ज्याचे अस्तित्वच असू नये. विशेष ऑपरेशन्सची टीम मिलिशियाच्या ताब्यातील प्रदेशातून नदीमार्गे पुढे सरकत असताना, ही मोहीम हळूहळू भयावह अधःपतनात बदलते आणि ते त्या विमानाजवळ पोहोचू लागतात तसतसे हे अधिक स्पष्ट होत जाते की ते ते विमान कधीच परत आणण्यासाठी पाठवले गेले नव्हते.
ब्लूफ्लाय हा धाडसी विज्ञानकथा संकल्पनेत गुंफलेला, व्यक्तिरेखांवर आधारित तीव्र थ्रिलर आहे. प्रियंका चोप्रा जोनस सध्या जागतिक स्तरावर बहुआयामी भूमिका करत असताना या नव्या प्रोजेक्ट मध्ये तिला बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
