Priyanka Chopra: प्रियांकाची लेक मालतीविषयीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणजेच सर्वांची लाडकी देसी गर्ल (Desi Girl) सध्या तिच्या सुखी संसारामध्ये खूपच रमली असल्याचे दिसून येत आहे. लग्नानंतर (marriage) परदेशामध्ये स्थायिक झालेली देसी गर्ल मध्यंतरी पती निक जोनस आणि मुलगी मालतीला (Malti) घेऊन भारतात आली होती. भारतात आल्यानंतर पहिल्यांदा तिने लेकीचा चेहरा दाखवला होता.   View this post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T151311.267

Priyanka Chopra

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणजेच सर्वांची लाडकी देसी गर्ल (Desi Girl) सध्या तिच्या सुखी संसारामध्ये खूपच रमली असल्याचे दिसून येत आहे. लग्नानंतर (marriage) परदेशामध्ये स्थायिक झालेली देसी गर्ल मध्यंतरी पती निक जोनस आणि मुलगी मालतीला (Malti) घेऊन भारतात आली होती. भारतात आल्यानंतर पहिल्यांदा तिने लेकीचा चेहरा दाखवला होता.


देसी गर्ल गेल्या काही दिवसांसाठी मायदेशी परतली होती. पण तिला तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले आहे. सध्या देसी गर्लच्या हाती हॉलिवूडबरोबरच (Hollywood) बॉलिवूडमध्ये (Bollywood) देखील सिनेमा आहेत. देसी गर्लने तिच्या आगामी सिनेमाबाबत बोलत असताना मुलीबाबत केलेलं भाष्य सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. देसी गर्लने मालतीला खूप जीवापाड जपत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

तसेच कामामधून वेळ काढत मालतीसोबत ती एण्जॉय करत असल्याचे देखील दिसून येत असते. आता तर लेकीसाठी ती करिअर सोडायला देखील तयार आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत मोठे भाष्य केले आहे. देसी गर्लने सांगितले आहे की, ‘करिअरचा त्याग करणं असो किंवा देश सोडणं असो मुलीसाठी मी या दोन्ही गोष्टी करण्यास तयार आहे. हा खूप मोठा त्याग आहे.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुलांसाठी त्याग करणारे आई- वडील मला मिळाले, यासाठी मी स्वतःला खूप नशिबवान देखील समजते. पण अजून देखील असे काही आई- वडील आहेत जे आपल्या मुलींना सामाजिक दबावामुळे प्रोत्साहन देत नाहीत. मुलांचा सांभाळ करत असताना आई-वडिलाबरोबरच घरामधील मंडळींनी एकत्र बसून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.

तसेच महिलांचा सन्मान केला पाहिजे, ही शिकवण देखील मुलांना दिली पाहिजे. शिवाय मुलींना स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम केले पाहिजे. देसी गर्लने तिच्या मुलीचा सांभाळ अगदी योग्य पद्धतीने करत आहे. तसेच मुलीसाठी प्रत्येक गोष्ट करण्यास ती तयार आहे हे तिच्या बोलण्यामधून स्पष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version