Priyanka Chopra: अमेरिकेतील ‘त्या’ दिवसांविषयी देसी गर्लचा खुलासा, म्हणाली, “वॉशरुममध्ये जाऊन…”

Priyanka Chopra: बॉलीवूड अभिनेत्री देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने सांगितले आहे की, जेव्हा ती युएसला (America) राहायला गेली होती, तेव्हा सुरुवातीच्या दिवसांत ती वॉशरुममध्ये जाऊन लंच करत असायची. देसी गर्लने दिलेल्या माहितीनुसार ती अचानक खूप नर्व्हस व्हायची आणि तिला समजत नसायचे की कसं कॅफेटेरियात जाऊन लंच करायचं. आणि मनातील ही अस्वस्थता तिला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T124423.959

Priyanka Chopra

Priyanka Chopra: बॉलीवूड अभिनेत्री देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने सांगितले आहे की, जेव्हा ती युएसला (America) राहायला गेली होती, तेव्हा सुरुवातीच्या दिवसांत ती वॉशरुममध्ये जाऊन लंच करत असायची. देसी गर्लने दिलेल्या माहितीनुसार ती अचानक खूप नर्व्हस व्हायची आणि तिला समजत नसायचे की कसं कॅफेटेरियात जाऊन लंच करायचं. आणि मनातील ही अस्वस्थता तिला वॉशरुममध्ये जाऊन लंच करण्यासाठी भाग पाडत असायची.


देसी गर्लने बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या बळावर मोठं यश संपादित केलं आहे. गेल्या अनेक वर्ष हिंदी सिनेमाच्या लोकांचे मनोरंजन केल्यावर तिने हॉलीवूडची जागा पकडली होती, आणि आता ती जास्त हॉलीवूडच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येत आहे. आज ती खूप आत्मविश्वासू दिसते पण आधी ती अशी अजिबात नव्हती.


देसी गर्लने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमेरिकेतील काळाचा उल्लेख केला, जेव्हा ती टीनेजर होती आणि पहिल्यांदा अमेरिकेला शिक्षणासाठी गेली होती. प्रियंका चोप्रामध्ये तेव्हा आणि आता इतका आत्नविश्वास मुळीच नव्हता की ती सर्वांबरोबर बसून लंच करेल अशी परिस्थिती नव्हती. परदेशी लोकांमध्ये ती स्वतःला खूप कमी लेखत असायची. देशी गर्लनं सुरुवातीचे काही आठवडे आपल्यासाठी किती भयानक होते, याचा खुलासा केला आहे.

या सर्व गीष्टीतून ती कशी बाहेर आली, तिने यावर तिचा आत्नविश्वास कसा वाढवला, स्वतःला कसं सावरले याविषयी गौप्यस्फोट केला आहे. प्रियंका चोप्रा म्हणाली, ‘मी त्यावेळी एक छोटं शॉप होतं, त्याच्या वॉशरुममध्ये जाऊन माझा लंच करत असायची. कारण मी खूप नर्व्हस फील स्वतःला करत असायची. मला माहित नव्हतं की कसं कॅफेटेरियात जाऊन तिथून लंच घ्यायचं. मी एका वेंडिंग मशिनमधून वेफर्स खरेदी करत होती.


मी वॉशरुममध्ये जायची, लवकर लवकर खायची आणि पटकन क्लासला निघून जायची. यामुळे मग मला सगळ्यांना टाळता यायचं आणि कोणत्याही गोष्टीचा सामना करावा नसायचा. देशी गर्लने पुढे सांगितले की, एक भारतीय होण्यापेक्षा जास्त मला एक नॉन- अमेरिकन असल्याचे जाणवत असायचे. प्रियंका चोप्राने सांगितले की, तिनं तिच्या आयुष्यात खूप गोष्टींमध्ये बदल आणले, अनेक नव्या गोष्टींमध्ये स्वतःला फीट करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

आपण एका कंझर्व्हेटिव्ह फॅमिलीतून आहोत, यामुळे आपल्याला कोणासोबत डेटवर जाण्याची किंवा नाइट आऊटसाठी बाहेर जाण्याची परवानगी नसायची, हे तिला तिच्या मैत्रिणींना सांगावे लागले होते. अर्थात नंतर हळूहळू तेथील लोकांसोबत देसी गर्लने स्वतःला अॅडजस्ट करत गेली, आणि आत्मविश्वास प्राप्त केला ज्याकारणाने आज ती यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचली आहे. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर देसी गर्ल सध्या आपल्याला स्पाय सीरिज Citadel मध्ये दिसत आहे.

Exit mobile version