Download App

2024 मध्ये सर्वात जास्त कमाई ; स्वप्नील जोशीचे ‘हे’ दोन चित्रपट ठरले अव्वल!

  • Written By: Last Updated:

Swapnil Joshis two films In highest-grossing films of 2024 List : निर्माता आणि अभिनेता म्हणून 2024 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे (Swapnil Joshi) दोन चित्रपट अव्वल ठरले. स्वप्नील जोशीचे कोणते दोन चित्रपट हाययेस्ट ग्रोसिग फिल्म (Marathi Movie) ठरले, ते आपण जाणून घेऊ या.

अनेक कलाकारांनी 2024 वर्षाला निरोप देताना हे वर्ष खास केलं. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारे मराठी मधले अनेक चित्रपट चर्चेत देखील (Entertainment News) आले. अश्यातच निर्माता आणि अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई तर केली, पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाययेस्ट ग्रोसिग फिल्म ठरले.

Team India : कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये?, जाणून घ्या समीकरण

निर्माता म्हणून स्वप्नील जोशी ने 2024 वर्षात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला, सोबतीने बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल ठरला. जगभरात या चित्रपटाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

पुढे स्वप्नीलने बहुचर्चित ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर केलं, पण सोबतीने चित्रपटगृहात सगळ्यात जास्त दिवस हा चित्रपट देखील राहिला. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून त्याने आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

Game Changer Film: पाच गाण्यांच्या चित्रिकरणासाठी 75 कोटी रुपय चुराडा, राम चरणच्या ‘गेम चेंजर’ची गोष्ट

वर्ष संपताना स्वप्नील जोशी हा या वर्षातला सगळ्यात हाययेस्ट ग्रोसिग फिल्म देणारा निर्माता आणि अभिनेता ठरला आहे. आगामी वर्षात स्वप्नील आता काय घेऊन येणार, हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

 

follow us