AP Dhillon’s concert : इंडो-कॅनेडियन गायक आणि रॅपर एपी धिल्लन (AP Dhillon) यांच्या भारत दौऱ्याला मुंबईतून सुरुवात झाली. या गायकाने शनिवारी मुंबईतील आर-2 मैदानावर परफॉर्म केले. दरम्यान, एपी धिल्लनच्या कॉन्सर्टचे (AP Dhillon’s concert) आयोजक आणि निर्माते संजय साहा (Sanjay Saha) आणि राधिका नंदा यांनी या कॉन्सर्ट आयोजित करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी अशा कॉन्सर्ट आयोजित करणं ही काळाची गरज असल्याचं सांगत एपी धिल्लन कॉन्सर्ट प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक, एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
संजय साहा आणि राधिका नंदा म्हणतात, आमच्यावर संगीताचा मोठा प्रभाव आहे. सगळ्या प्रकारचं संगीत आम्ही ऐकतो. विशेषत: एपी धिल्लनच्या संगीताचे आम्ही चाहते आहोत. त्यांच्या जादुई संगीताचा विलक्षण प्रभाव आमच्यावर आहे. धिल्लनचे कॉन्सर्ट श्रोत्यांना एक वेगळी अनुभूती देतात. हा कॉन्सर्ट आयोजित करण्यामागची आमची तिच प्रेरणा आहे. हा कॉन्सर्ट एक अविस्मरणीय अनुभव देतोच. शिवाय मनोरंजनही करतो. AP Dhillon कॉन्सर्टसाठी, आम्ही नाविन्यपूर्ण स्टेज डिझाइन्स केलंत. मल्टीमीडिया इफेक्ट्सद्वारे, इमर्सिव्ह व्हिज्युअलचा देखील समावेश केला. संगीताला पूरक असे दृश्यात्मक वातावरण तयार करून प्रेक्षकांची संगीताची रुची वाढवण्याचा आमचा मानस असल्यचां साहा यांनी सांगितलं.
बॉलीवूडमधील काही दिग्गज तारे-सितारे देखील या कॉन्सर्टला उपस्थित राहिल्याने आम्हाला आनंद झाला. या कार्यक्रमात आलिया भट्ट, रणवीर सिंग, नेहा शर्मा आणि आणखी काही सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हा कॉन्सर्टआयोजित करणं हे आमच्यासमोर मोठं आव्हान होतं. AP Dhillon चे लाखो लोक चाहते आहेत. त्यांच्या कॉन्सर्टला चाहते मोठ्या प्रमाणावर हजेरी लावणार हे ध्यानात घेऊन आम्ही सुसज्ज पार्किंग आणि अन्य पायाभूत सुविधा श्रोत्यांना दिल्या. ठिकाण निवडीपासून ते तिकीट वितरण व्यवस्था कशी असेल याचं सगळं प्लॅनिंग कित्येक दिवसांपासून सुरू होतं.
साहा एकदम सांगतात, मला संगीत, चित्रपट आणि लाइव्ह परफॉर्मन्सची खूप आवड आहे. हा कॉन्सर्ट बॉलिवूडला जागतिक संगीत ट्रेंडशी जोडू शकतो. विविध संगीत शैली आणि कलाकारांना एकत्र आणून, आम्ही परस्पर सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सर्जनशीलतेसाठी एक व्यासपीठ तयार करत आहोत
या फ्युजनमध्ये अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण संगीत निर्माण करण्याची क्षमता आहे,
बॉलीवूड कलाकार आणि जागतिक संगीतकार यांच्यातील सहकार्यामुळे अत्याधुनिक संगीताची निर्मिती होऊ शकते, असंही साहा म्हणाले.
AP Dhillon कॉन्सर्ट आम्ही चांगल्या पद्धतीने आयोजित करू शकलो यांचं श्रेय आमच्या कोअर टीमचं आहे. आमच्या टीमसोबत आम्ही अनेक इव्हेंट शो आजवर आयोजित करू शकल्याचं साहा आणि नंदा यांनी सांगितलं.