मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक, एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Eknath Shinde : सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने (Karnataka Government) विरोध केला. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून याप्रश्नी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती.
मोठी बातमी! आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडला
या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
RBI चे नवे बॉस संजय मल्होत्रा यांच्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही