मोठी बातमी! आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडला

  • Written By: Published:
मोठी बातमी! आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडला

MLA Yogesh Tilekar : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ (Satish Wagh) यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे. त्यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळं पुण्यात  एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी पुण्यात (Pune) भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण करण्यात आला होता. चार चाकी वाहनातून आलेल्या चौघांकडून त्यांचा अपहरण करण्यात आला होता. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. सतीश वाघ आज सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लू बेरी हॉटेल समोर थांबले असताना अचानक एक चार चाकी समोर येऊन थांबली आणि त्यातील दोघा जणांनी त्यांना गाडीत बसवून त्यांचं अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

RBI चे नवे बॉस संजय मल्होत्रा यांच्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली होती. मात्र आता यवत गावच्या हद्दीत भाजप आमदार सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली असून त्यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेतील ‘त्या’ युवा नेत्याला एकनाथ शिंदेंच्या कार्यालय अन् निवासस्थानाबाहेर फिरण्यास बंदी, कारण…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube