मोठ्या राज्यात भाजप, छोट्या राज्यात इतर ; निवडणुकीची आकडेवारी सांगत शरद पवारांची टीका
Sharad Pawar on Bjp : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. तर महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यावरून महाविकास आघाडीकडून इव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाजपवर टीका केलीय. राज्यातील निवडणुकीत पक्षांना मिळालेली मते आणि मिळालेल्या जागांवर त्यांनी काही शंका उपस्थित केल्या. मोठ्या राज्यात भाजपला (BJP) सत्ता मिळत आहे. तर लहान राज्यात विरोधकांनी सत्ता दिली जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी कोल्हापूर येथे केली. या निवडणुकीतील आकडे आश्चर्यकारक आहे. पण ठोस अशी माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी पुष्टीही पवार यांनी जोडली आहे.
शरद पवार म्हणाले, अधिकृत माहिती नसल्याने इव्हीएम भाष्य करणे योग्य नाही. लोकसभेनंतर चार निवडणुका झाल्या आहेत. हरियाणामध्ये भाजपची अवस्था कठीण होती. पण भाजप सत्तेवर आली आहे. त्याच इव्हीएमवर जम्मू काश्मीर फारुक अब्दुला पक्षाला सत्ता मिळालेली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाली आहे. भाजपला यश आले आहे. याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला आहे. याबाबत सत्ताधारी पक्ष सांगू शकतात. इव्हीएमचा संबंध नाही. पण एक चित्र दिसते आहे की तेथे मोठे राज्य तेथे भाजप आहे. छोटे राज्यात दुसरे पक्ष सत्तेत असे तरी सध्या दिसत आहे, अशी टीका पवार यांनी केली. काँग्रेस पक्षाला 80 लाख मते पडली आणि त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर शिंदे गटाला 79 लाख मते मिळाली आहेत, त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही काँग्रेसपेक्षा 41 आमदार अधिक निवडून आलेत. तर शरद पवार गटाच्या पक्षाला मते 72 लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त दहा. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 58लाख मतदान मिळालेत. पण त्यांचे 41 आमदार निवडून आलेत. या आकड्यांचे आश्चर्य वाटते, असे पवार म्हणाले.
निवडणुकीत वातावरण अनुकूल निकाल वेगळाच
मी अनेक ठिकाणी सभेला गेलो आहे. माळशिरस, इचलकरंजी येथे सभा झा्या. त्या सभा बघितल्यानंतर निकाल काय लागणार असे सांगायची गरज नव्हती. इचलकरंजीचे वातावरण हे अनुकूल होते. पण निकाल अनुकूल नाही. जोपर्यंत सत्य माहिती मिळत नाही. तोपर्यंत सांगणे योग्य ठरणार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकत्र लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी सगळे एकत्र समोरे जाणार आहोत. मी आयुष्यात 14 निवडणुका पाहिल्या आहेत. पहिल्यांदा हा पराभव पाहिला आहे. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. निवडणुकीचे वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही.