Pune Crime :पुणे हादरले! हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या, 12 तासात दोन खून….

  • Written By: Published:
Pune Crime :पुणे हादरले! हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या, 12 तासात दोन खून….

Finance Company Manager Murder Pune: पुण्यातील हडपसर परिसरात एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी (Vasudev Kulkarni) असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. ते शतपावली करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेच्या काहीच तास आधी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे 12 तासांत दोन खुनाच्या घटनांनी पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune Crime :पुणे हादरले! हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या, 12 तासात दोन खून…. 

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल रात्री त्यांच्या नाना पेठेतील कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री हडपसर परिसरात एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाचा खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एका नामांकित फायनान्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. घरासमोर शतपावली करत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पोबारा केला.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य,’वृषभ’ राशीच्या लोकांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये 

दरम्यान, या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. वासुदेव कुलकर्णी यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

दरम्यान, पुण्यात अवघ्या 12 तासांत दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे शहरात सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळण्याचे आवाहन केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube