मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर पाच राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू…

  • Written By: Published:
मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर पाच राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू…

Vanraj Andekar : पुण्याती नाना पेठेत रविवारी रात्री राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेक (Vanraj Andekar) यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली. आंदेकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत. आंदेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील मध्यवर्ती भागात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर पाच राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू… 

सविस्तर वृत्त असे की, वनराज आंदेकर हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात वनराज हे गंभीर जखमी झाले असून शूटर फरार झाले आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आंदेकर यांच्यावर आधी गोळ्या झाडून नंतर चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चौकातील दिवे बंद असताना आणि ते एकटाच असताना हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

‘फडणवीसांकडून महाराजांचे शौर्य कमी करण्याचे प्रयत्न…’, फडणवीसांच्या वक्तव्यावर आव्हाड संतापले

घरगुती कार्यक्रम असल्याने आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन-चार जणांनी आधी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी आंदेकर यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

वनराज यांच्यावर झालेल्या गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, वैमनस्यातून वनराज यांच्यावर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. नाना पेठेत आंदेकर टोळीचे वर्चस्व आहे.

गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयित आरोपींची नावे असून ते सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube