सख्खा भाऊ अन् वहिनीनेच काढला काटा; पुण्यातील ‘त्या’ धक्कादायक खु्नाचं गुढ उकललं..
Pune Crime : पुणे शहरात काही दिवसांपू्र्वी खुनाचा एक अतिशय भयानक (Pune Crime) प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करुन फेकले होते. संगमवाडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले होते. खून झालेल्या या तरुणीचं वय अंदाजे १८ ते ३० इतकं आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे. पोलिसांच्या तपासातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत तरुणीचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नसून तिचाच सख्खा भाऊ आणि वहिनी आहेत. खोलीच्या मालकीच्या वादातून ही भयानक हत्या झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्रात आढळून आलेला मृतदेह सकीना खान नावाच्या तरुणीचा होता. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केली. घरातील धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. ज्या दिवशी पुण्यात खूप पाऊस होता त्या दिवशी संगमवाडी इथल्या नदीपात्रात फेकून दिले. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर शेजारच्या लोकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि हत्येचा उलगडा झाला. पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे. पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून ही हत्या घडली. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ आणि वहिनी तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र सकिना खोली सोडण्यास तयार नव्हती. अखेर भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
अज्ञात इसमाने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले होते. त्यानंतर हे धड मुठा नदीपात्रात टाकून दिले होते. अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस घटनेचा अधिक तपास करून आरोपी जेरबंद केले आहेत.
“मला एकटीला खोलीत बोलवत होते” पूजा खेडकरांचा आरोप, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं सडेतोड उत्तर