“सावरकर ब्राह्मण होते, गोमांस खात होते”; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा

“सावरकर ब्राह्मण होते, गोमांस खात होते”; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा

Karnataka News : देशात सध्या स्वातंत्र्यवीर सावकरांची चर्चा पुन्हा (Swatantrya Veer Savarkar) सुरू झाली. काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Congress Party) त्यांच्या आत्मचरित्रात सावकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचं कौतुक केलं. त्यांच्या या पवित्र्याने काँग्रेसची कोंडी झालेली असतानाच आणखी एका काँग्रेस नेत्याने काँग्रेसच्या या अडचणीत भर टाकली आहे. कर्नाटकच्या काँग्रेस (Karnataka News) सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अतिशय खळबळजनक दावा केला आहे. यामुळे देशभरात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गुंडुराव म्हणाले, वीर सावरकर ब्राह्मण होते पण ते गोमांस खात होते. त्यांनी गोहत्येचा कधीच विरोध केला नाही. या विषयावर सावरकर खूप मॉडर्न होते. त्यांच्या विचारात कट्टरता होती तर दुसरीकडे त्यांनी आधुनिकतेचाही स्वीकार केला होता. सावरकरांच्या बाबतीत काही लोक असेही म्हणतात की ब्राह्मण असताना ते गोमांस खात होते आणि याचा प्रचारही करत होते. याच दरम्यान गुंडुराव यांनी महात्मा गांधींचा उल्लेख केला. महात्मा गांधी सांस्कृतिक (Mahatma Gandhi) पंरपरेत विश्वास असणारे शाकाहारी होते. त्यांच्या दृष्टिकोनातून ते एक लोकतांत्रिक व्यक्ती होते.

सावरकरांबद्दल आदर म्हणूनच मी 1983 ला.. आत्मचरित्रात सुशीलकुमार शिंदेंनी केला मोठा खुलासा

गुंडुराव पुढे म्हणाले, समजा एखादा गोरक्षक एखाद्याला मारतो त्यावेळी आपण काहीतरी चुकीचं करत आहोत असा विचार त्याच्या मनात नसतो. हा सावरकरांच्या कट्टरवादाचा धोका आहे. हाच कट्टरवाद आता देशात मोठ्या प्रमाणात रुजू लागला आहे. महात्मा गांधी एक धार्मिक व्यक्ती होते. सावरकरांच्या कट्टरवादाचा सामन करण्याचा खरा मार्ग गांधींचे लोकतांत्रिक सिद्धांत आणि त्यांचा दृष्टिकोन यातच आहे असे गुंडुराव म्हणाले.

काँग्रेसला सावरकरांकडून काहीच शिकता आलं नाही : ठाकूर

दरम्यान, गुंडुराव यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापू लागलं आहे. भाजपाने गुंडुराव यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते अनुराग ठाकूर म्हणाले, काँग्रेस तर खोटं बोलण्याचा कारखानाच आहे. भारत वीर सावरकरांचा अपमान कधीच सहन करणार नाही. देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या वीर सावरकरांकडून काँग्रेसला काहीच शिकता आलं नाही. काश्मिरात कलम ३७० काँग्रेसनेच दिलं होतं. ही जवाहरलाल नेहरू यांची मोठी चूक होती. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. देश तोडणाऱ्यांना काँग्रेस पक्षात घेऊन राहुल गांधी तुकडे-तुकडे विचारधारेला पुढे घेऊन चालले आहेत अशी घणाघाती टीका ठाकूर यांनी केली.

ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक! सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार; ज्येष्ठ नेत्याचा दावा..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube