Anurag Thakur ; ‘कुस्तीपटूंच्या सर्व मागण्या मान्य’, पण कुस्तीपटू भूमिकेवर ठाम
Wrestlers Protest Update : गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (BrijBhushan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे जंतरमंतर येथे आंदोलन सुरु आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कुस्तीपटूंना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. ब्रिजभूषण सिंग यांना अटक होत नाही तोपर्यंता जंतरमंतरवर आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बंद केली. ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची त्यांची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. अन्य काही समस्या असेल तर उच्च किंवा कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतात, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.
जयंत पाटलांचं एकाच वाक्यात ट्विट पण, ‘ते’ ठासून का सांगितलं ?
यावर बोलताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “एक समिती स्थापन करण्याची मागणी होती आणि ती स्थापन करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निकाल दिला आहे. दिल्ली पोलिस निष्पक्ष तपास करत आहेत… मी खेळाडूंना विनंती करतो की त्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत आणि त्यांनी चौकशी पूर्ण होऊ द्यावी.”
राणेंचा राजकीय बाप कोण असेल? तर ते म्हणजे उद्धव ठाकरे होय…
कुस्तीपटू म्हणाले, “आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, आंदोलन सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धक्का नाही, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जे केले तेच केले आहे. आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत, आम्ही सल्लामसलत केल्यानंतर भविष्यातील रणनीती ठरवू.
याआधी बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंसाठी आणले जाणारे फोल्डिंग बेड थांबवले होते. त्यानंतर जंतरमंतरवर गोंधळ झाला होता. संगीता फोगटचा भाऊ दुष्यंत यांच्यासह दोन कुस्तीपटूंना दुखापत झाली आहे. विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी दावा केला आहे की त्यांना पुरुष पोलिस अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली.