…तरच विरोधकांना महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार; फडणवीसांनी गांधींच्या सुचनेचा दाखलाच दिला
Dcm Devendra Fadnavis : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या सुचनेची अंमलबजावणी केली तरच विरोधकांना महात्मा गांधी यांच्यावर बोलण्याचा अधिकार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, महात्मा गांधी यांची आज जयंती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना महात्मा गांधी यांनी दिलेल्या सुचनेचा दाखला देत काँग्रेस नेत्यांवर टीका केलीयं.
“खलनायकाला लाजविल असं त्यांचं कृत्य, त्यांचं खरं रुप..”, मुश्रीफांचं घाटगेंना व्याजासह उत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक महात्मा गांधी यांना मानत असतील तर महात्मा गांधींनी जी सूचना दिली होती, त्या सुचनेला विरोधकांनी अंमलात आणलं पाहिजे. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यामुळे आता काँग्रेसची उपयोगिता संपलेली आहे. आता कॉंग्रेसचं विसर्जन केलं पाहिजे अन्यथा काँग्रेस देशाच्या प्रगतीसाठी अडथळा बनेल, असं गांधींनी सांगितलं होतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलायं. तसेच गांधींच्या या सुचनेचं विरोधकांनी पालन केलं तरच त्यांना गांधींवर बोलण्याचा अधिकार आहे, अशी सडकून टीकाही फडणवीसांनी केलीयं.
क्रिकेटविश्वात खळबळ! एकाच तासांत दोन कर्णधारांचे राजीनामे; नेमकं काय घडलं?
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. तर राज्यात मुंबईत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्यावतीने शांतता रॅली काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर गांधी यांच्या जयंतीनिमित्त देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केलीयं.