“खलनायकाला लाजविल असं त्यांचं कृत्य, त्यांचं खरं रुप..”, मुश्रीफांचं घाटगेंना व्याजासह उत्तर

“खलनायकाला लाजविल असं त्यांचं कृत्य, त्यांचं खरं रुप..”, मुश्रीफांचं घाटगेंना व्याजासह उत्तर

Hasan Mushrif replies Samarjeet Ghatge : राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी (Maharashtra Elections) तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) कागल मतदारसंघाची निवडणूक जास्तच चर्चेत आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि नुकतेच शरद पवार गटात दाखल झालेले समरजीत घाटगे यांच्यातच (Samarjeet Ghatge) लढत होईल असा अंदाज आहे. त्यामुळे या दोघांनीही तयारी सुरू केली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत.

विरोधकांकडून आता मेळावे घेतले जात आहेत. त्यात त्यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की आता जी लढाई होणार आहे ती निष्ठा आणि निष्ठेचा सौदागर यांच्यात होणार आहे. विरोधकांच्या या आरोपांवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार उत्तर दिले. मुश्रीफ म्हणाले, ज्यांनी (समरजीत घाटगे) आजपर्यंत इतका फायदा ज्या भारतीय जनता पक्षाचा घेतला. इतका फायदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेबांचा घेतला आणि बिचाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून कसलीही गुरूदक्षिणा दिली नाही. मागील वेळच्या निवडणुकीत सुद्धा अपक्ष उभे राहिलेच. पक्षाचं मानलं नाही. युतीच्या उमेदवाराच्या बाजूने त्यांनी राहायला हवं होतं. आताही दोनदा पाठीत खंजीर खुपसला. पण मी मात्र जी काही भूमिका घेतली होती ती शरद पवार साहेबांना (Sharad Pawar) सांगूनच घेतली होती. त्यामुळे मी विश्वासघात केला हे पवार साहेब देखील मान्य करणार नाहीत.

“शरद पवार, आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी..” मुश्रीफांचा नारा अन् टार्गेटही ठरलं!

मी माझ्या वरिष्ठांना सांगून पक्षाबाहेर पडलो पण तुम्ही मात्र अजितदादांबरोबर थेट शपथविधीलाच हजर राहिलात असा आरोप समरजीत घाटगे यांनी केल्याचे विचारले असता मुश्रीफ म्हणाले, त्यांना किती माहिती आहे? ते सांगून आले म्हणतात म्हणजे काय? कधीतरी एकदा परीक्षा तरी द्यायला पाहिजे होती. पक्षाने सांगितल्यानंतर कधीतरी थांबायला पाहिजे होतं. पण त्यांनी असं कधीच केलं नाही. त्यांनी कुठलीही परतफेड न करता पाठीत खंजीर खुपसला. तसं मी कधीच केलं नाही. आम्ही अनेकदा पवार साहेबांना जाऊन भेटलो होतो. मंत्रिमंडळात गेल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना जाऊन भेटलो. मीडियाने देखील हे सगळं दाखवलं होतं. त्यामुळे या गोष्टींची पवार साहेबांना पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी समजूनही घेतलं.

समरजीत घाटगे खलनायक प्रवृत्तीचे आहेत. त्यांची अनेक उदाहरणं मी सांगितली आहेत. ज्यावेळी हे फडणवीस साहेबांकडे गेले होते. त्यांनी तक्रारी केल्या. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जवळपास चार हजार पेन्शन बंद केल्या. त्यामुळे हा माणूस काय प्रवृत्तीचा आहे हे समाजाला कळलं पाहिजे आज तुम्ही निवडणुकीला उभे राहाताय म्हटल्यावर तुम्ही तुमची बाजू स्वच्छ केली पाहिजे. त्याविषयावर काहीच बोलत नाही आणि मीडियाबाजी मात्र दुसऱ्याच मुद्द्यावर करतात हे अतिशय चुकीचं आहे. त्यांचं खरं स्वरुप वेगळंच आहे. खलनायकाला लाजवेल असं त्यांचं कृत्य आहे अशी घणाघाती टीका हसन मुश्रीफ यांनी केली.

शरद पवारांनी दीड तास क्लास घेतला अन्.., समरजीत घाटगेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube