“शरद पवार, आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी..” मुश्रीफांचा नारा अन् टार्गेटही ठरलं!

“शरद पवार, आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी..” मुश्रीफांचा नारा अन् टार्गेटही ठरलं!

Hasan Mushrif on Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात काल कोल्हापूर केंद्रस्थानी होतं. येथील कागल शहरातील गेबी चौकात शरद पवार यांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. यावेळी शरद पवार आणि जयंत पाटील यांनी (Jayant Patil) मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. लाचारीचा स्वीकार करणाऱ्यांना कागलकर धडा शिकवणार, साथ देण्याऐवजी साथ सोडून जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असे आव्हान शरद पवार यांनी दिले होते. त्यांच्या याच आव्हानाची चर्चा सुरू होती. आता या आव्हानाला मंत्री मुश्रीफ यांनीच प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार साहेब आपसे बैर नही लेकीन समरजीत तेरी खैर नहीं असा नारा हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif) दिला.

जंगलाला आग लागली अन् गेंडा पळाला, मुश्रीफांच्या गडात जानकरांची तुफान फटकेबाजी

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंगळवारी कागलमध्ये झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं. मुश्रीफ म्हणाले, शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकाच्या मागे का लागले आहेत हे कळत नाही. माझ्या सहा निवडणुकांमध्ये शरद पवार आले. ते नेहमी म्हणायचे की राजा विरोधात प्रजा जिंकली पाहिजे. तेच मीही म्हणत आहे. निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं, लेकीन समरजीत तेरी खैर नही.

आधी जयंत पाटील साहेब येथे येऊन गेले होते. त्यावेळी मात्र समरजित घाटगे यांनी प्रवेश केला नाही. पण काल शरद पवार साहेब आले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. माझ्यासारख्या अल्पसंख्यांकाच्या मागे का लागता हेच मला कळत नाही, असे मुश्रीफ म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा रोख शरद पवार यांच्याकडेच होता हे यावरून स्पष्ट होत आहे. समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्याने काय परिणाम होईल असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. निवडणुकीत काय होईल याचा निकाल तर जनताच देईल. पण कुणालाही कमी लेखून चालत नाही, असे उत्तर मुश्रीफ यांनी दिले.

घाटगेंना आधी निवडून तर येऊ द्या…

कालच्या कागल येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले होते की समरजित घाटगे यांना कागलकरांनी मोठ्या मतांनी निवडून आणावं. ते नंतर नुसते आमदारच राहणार नाहीत तर त्यांना तिथे हवे ते काम करण्याची संधी दिली जाईल. हा विचार बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात आहे. एका अर्थाने शरद पवारांनी घाटगेंना मंत्रि‍पदाची ऑफरच देऊन टाकली होती. या वक्तव्यावर मुश्रीफ यांनीही खोचक टोलेबाजी केली. मंत्री व्हायचं असेल तर आधी निवडून यावं लागतं. मागील सहा निवडणुकीत मी विजयी झालो आहे. प्रत्येक वेळी माझ्यासमोर एकापेक्षा एक उमेदवार होते. तीन वेळी तिरंगी तर दोन वेळा थेट लढत होती. तरीदेखील मी विजयी झालो होतो, अशी आठवण मुश्रीफ यांनी या निमित्ताने करून दिली.

समरजित घाटगे फक्त आमदारच राहणार नाहीत तर..,; शरद पवारांनी शब्दच दिला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube