Hasan Mushrif : ‘मी पुन्हा निवडणूक लढणार नाही, कोल्हेंनीच खासगीत सांगितलं’; मुश्रीफांचा मोठा खुलासा

Hasan Mushrif : ‘मी पुन्हा निवडणूक लढणार नाही, कोल्हेंनीच खासगीत सांगितलं’; मुश्रीफांचा मोठा खुलासा

Hasan Mushrif Criticized Amol Kolhe : लोकसभा निवडणूक जवळ येत चालल्याने सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिरुर मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. मागील दोन दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या वादात आता वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उडी घेतली आहे. मुश्रीफ यांनी अमोल कोल्हेंबाबत काही खुलासे केले आहेत ज्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत मोठा खुलासा केला. मी पु्न्हा निवडणूक लढवणार नाही असे कोल्हे यांनीच मला अनेकदा सांगितलं आहे. त्यामुळे माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला आहे. खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होतोय असे त्यांनी मला अनेकदा खासगीत सांगितलं आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्का! लोकसभेला उमेदवारी न दिल्याने कट्टर समर्थक मातोश्रीवर

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमरावती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. आज सकाळीच शरद पवार यांनी कडूंच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांत बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली अद्याप याची माहिती समोर आलेली नाही. यावर पत्रकारांनी मुश्रीफ यांना विचारले. त्यावर मुश्रीफ म्हणाले, पवार साहेबांनी आधीच सांगितलं आहे की ही भेट राजकीय नाही.

पुणे दौऱ्यात काय म्हणाले होते अजित पवार ? 

शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर बरे झाले असते. दीड वर्षापूर्वी तो खासदार मला राजीनामा द्यायचा आहे, म्हणत माझ्याकडे आला होता. पण त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचे रान केले होते. त्यांना आणि मला खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळे चाललेले आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे, मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही.

‘भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं’ मंत्री हसन मुश्रीफांचा घरचा आहेर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज