Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्का! लोकसभेला उमेदवारी न दिल्याने कट्टर समर्थक मातोश्रीवर

Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्का! लोकसभेला उमेदवारी न दिल्याने कट्टर समर्थक मातोश्रीवर

Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली. यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या ठिकाणीच अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

जरांगेंचा वार-भुजबळांचा पलटवार; ‘काही दिवसांनी भुजबळ भजे अन् जिलेबीचे कागदं खाणार’

कारण या ठिकाणी दोन वेळा लोकसभा निवडणुकीची तयारी करून देखील अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांनी यावेळी लोकसभेची संधी होऊ नये म्हणून थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात एकच खळबळ उडालीय.

Nitish Kumar : मी नाराज नाही! अखेर नितीश कुमारांचा यूटर्न…

संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे मोठे नेते मानले जातात. त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीत होते. त्यांनी शरद पवारांना खंबीर साथ दिली. पवार घराण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संजोग वाघेरे यांनी सुरुवातीला शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर ते पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत गेले. दरम्यान वाघेरे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युला मध्ये वाघेरे यांना मावळमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर दिसू लागताच त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

तंजावरच्या ‘या’ खास वास्तूत होणार 100 व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलन प्रारंभ

या भेटीबाबत संजोग वाघेरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरेंची आपण घेतलेली भेट सदिच्छा भेट होती. मात्र मी मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या दोन टर्मपासून मी त्यासाठी तयारी केली. मात्र मला संधी मिळालेली नाही. ही संधी मला मिळावी हीच अपेक्षा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर ठाकरे यांनी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. मी अद्याप ठाकरे गटात प्रवेश केलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांचा निर्णयानंतर मी पुढची भूमिका जाहीर करणार. असल्याचं वाघेरे यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube