जरांगेंचा वार-भुजबळांचा पलटवार; ‘काही दिवसांनी भुजबळ भजे अन् जिलेबीचे कागदं खाणार’

जरांगेंचा वार-भुजबळांचा पलटवार; ‘काही दिवसांनी भुजबळ भजे अन् जिलेबीचे कागदं खाणार’

Chagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि अन्न नागरी व पुरवठा छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. तर दुसरीकडे सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ विरोध करताहेत. अशातच
छगन भुजबळ काही दिवसांनी भजे अन् जिलेबीचे कागदं खाणार असल्याची जळजळीत टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.

“महागाईचा भडका उडणार?” हूथी बंडखोरांमुळे भरली जगाला धडकी

मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरसकट मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करु नये, अशी भूमिकाच छगन भुजबळांनी मांडली आहे. त्यावरुन जरांगे आणि भुजबळ वाकयुद्धच पेटलं आहे. छगन भुजबळांनी आता जिलेबीचे कागदं चगळू नये आता ते लयच कमातून गेलं हो… माझी छाती सहा इंच असो की दोन इंच त्याला काय करायचं . आम्ही आमचं बघतो तू तूझं बघ. छगन भुजबळ येडपट त्यांना काही कळत नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’

छगन भुजबळ काय म्हणाले होते?
20 जानेवारीपर्यंत आता मनोज जरांगे पाटील रुग्णालयात राहतील. ते गर्जना तर फार मोठमोठ्या करतात.
12 इंचाची छाती ठोकून मोठ्या गर्जना करतो. आधीच 12 इंच छाती त्यामध्ये ठोकून-ठोकून काही गडबड होऊ शकते. त्यामुळे त्याने तब्येतीला संभाळावं हे माझं सांगण असल्याचं छगन भुजबळ म्हणाले होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरातील मराठा बांधवांकडून मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली जात आहेत. आत्तापर्यंत मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत दोन वेळा आमरण उपोषण केलं आहे. पहिल्यावेळी मनोज जरांगे यांनी 17 दिवस उपोषण केलं होतं. त्यावेळी सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर पुन्हा जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं तेव्हा बीडमध्ये आंदोलनााला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, दुसऱ्या उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा करण्यासाठी मुदत दिली होती. त्यानंतर सरकारने फेब्रुवारी विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, मराठा बांधवांकडून सरकारच्या घोषणेचा निषेध करण्यात आला असून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube