‘भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं’; मंत्री हसन मुश्रीफांचा घरचा आहेर

‘भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं’; मंत्री हसन मुश्रीफांचा घरचा आहेर

Hasan Musrif : ‘भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं’, असं म्हणत अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif) यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात सध्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन चांगलच वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. याच निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी भाजपबद्दलचा राग व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

Maratha Reservation : घोषणा, भाषणं नाही, लढावच लागणार; उद्यापासून जरांगे पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरणार

एकीकडे अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला आहे. अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ सत्ताधारी सरकारमध्ये मंत्री आहेत. अशातच आता ब्रिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन मुश्रीफ यांनी आमदार आबिडटकर यांच्या निशाणा साधताना भाजपबद्दलचा रागही बोलून दाखवला आहे.

Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपसोबत येईल असं वाटत नाही, आलंच तर ते कार्यकर्त्यांना मान्य होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत असला तरी स्थानिक पातळीवरील नेत्यामध्ये धुमश्चक्री सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maratha Reservation : आरक्षण टिकणाराच निर्णय घेणार; DCM देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

कोल्हापुरातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालीयं. या निवडणुकीचं वार वाहत असतानाच हसन मुश्रीफ यांनी हे विधान केलं आहे. या बिद्री कारखान्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

शंभूराज देसाईंवरील आरोपांमुळे अंधारे कायद्याच्या कचाट्यात; आधी नोटीस आता पोलिसात तक्रार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सध्या कारखान्यावर सत्ता असून त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर मैदानात आहेत. आबिटकर यांना समरजीतसिंह घाटगे यांचा पाठिंबा आहे.

खडसे नावामुळं मला डावलल जातं असेल तर…; रक्षा खडसेंनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी

दरम्यान, स्थानिक पातळीच्या राजकारणावर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं असलं तरीही मुश्रीफ यांना भाजप तुरुंगात टाकत होते म्हणूनच ते सत्तेकडे वळले आहेत का? भाजप खरंच त्यांना तुरुंगात टाकणार होते का? असा प्रश्नांना सध्या उधाण आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube