खडसे नावामुळं मला डावलल जातं असेल तर…; रक्षा खडसेंनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी

  • Written By: Published:
खडसे नावामुळं मला डावलल जातं असेल तर…; रक्षा खडसेंनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी

Raksha Khadse : तत्कालीन भाजप नेते आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजप (BJP) पक्षातील काही नेत्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी भाजपात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रक्षा खडसेंनीही आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त केली.

Gavran Meva : प्रतिक्षा संपली ! ‘गावरान मेवा’ घेऊन गणप्या अन् सुगंधा आले प्रेक्षकांच्या भेटीला 

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात प्राबल्य असलेलं खडसे राजकीय दृष्ट्या विभागल्या गेलं. सध्या एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहे. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत असून त्यांच्याकडे महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आहे. तर रक्षा खडसे भाजपात आहे. रक्षा खडेस ह्या खासदार आहे. आताही त्या रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याती तयारी करत आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने राहिले असतांना रक्षा खडसेंनी आपल्याला डावलल्या जातं असल्याचं विधान केलं.

आज माध्यमांशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या की, खडसे आडनाव आणि एकूण सगळी परिस्थितीता पाहता माझ्यावर मी पक्षांतर करणार आहे, असे आरोप झाले. पण याआधीही मी माझे मत अनेकदा मांडले आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र असलो तरी त्यांचा पक्ष वेगळा आणि माझा वेगळा आहे. आज तुम्ही कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही की, तुम्ही कुठं असायला पाहिजे. त्यांचे विचार त्या पक्षाशी जुळतात. माझे विचार या पक्षाशी जुळतात, म्हणून मी इथं आहे. माझं वैयक्तिक काम किंवा मी रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात केलेले काम, माझा जनसंपर्क आहे. तुम्ही फक्त खडसे नावामुळं मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं आहे, अशा शब्दात आपली नाराजीर रक्षा खडसेंनी बोलून दाखवली.

त्या म्हणाल्या, मी महिला म्हणून ज्या परिस्थितीत 2014 ची निवडणूक लढली हे सर्व जगाला ठावूक आहे. ती परिस्थिती लपवण्यासारखी नाही. मी कुठल्या परिस्थितीतून आले, हे सर्वाना ठाऊक आहे. माझी ओळख मी केवळ खडसेंची सून म्हणून ठेवली नाही. रक्षा खडसे हे नाव नाव लोकांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

एखादी महिला कुटुंबाच्या पाठिंब्यावर आणि कुणीतरी तिच्या मागे राहिले तरच ती पुढं जाऊ शकते, हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे, असंही खडसे म्हणाल्या.

कौटुंबिक पाठबळ असते, पण, त्या महिलेचं वैयक्तिक काम आणि कर्तृत्वंही असतंच. मीही तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. काम करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या मान्य करते. पण, मी त्यातून शिकले. मी पद घेऊन घरात बसले नाही. पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला नाही. पण, फक्त खडसे नाव असल्यानं माझ्या कामाचा विचार न करता मला बाजूला कसं काढायचं, हे चित्र जिल्ह्यात उभं राहत असेल तर ते चुकीचं आहे, अशी खंत रक्षा खडसेंनी बोलून दाखवली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube