Video : चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म मोडला का?, अजित पवारांचा पुन्हा भाजपवर वार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री आणि ऱाष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलताना भाजपला लक्ष केलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहे. (Pune) लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, या योजनेमुळं राज्यात महायुतीला सत्ता मिळाली. आता महापालिका निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रचारानंतर काँग्रेसनं निवडणूक आयोगाल पत्र लिहून 14 जानेवारीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे पैसे द्यावेत असं म्हटलं.
या पत्रात त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नसल्याचं म्हटलं होतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. निवडणूक आयोगानं सांगितलं तर 14 जानेवारीचा हप्ता पुढे ढकलू, असं अजित पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने सांगितले तर लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 16 तारखेला देऊ असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं. लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेसनं निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
रहते हैं कुछ लोग ख़ामोश,लेकिन उनके हुनर बोलते हैं; लांडगेंना समज अन् अजित पवारांना टोला
रोहित पवार यांनी अजित पवार यांचा उल्लेख रॉकी भाई केला होता, त्यावर बोलताना दादांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. मी केजीएफ पाहिलेला नाही. मी केजीएफ पाहतो आणि नंतर ठरवतो की रोहित ने मला रॉकी भाई म्हटलं ते योग्य की अयोग्य, असं अजित पवार म्हणाले. मी इथे महापालिका लढवतोय. मी इथे झालेल्या चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असं होतं का? असा सवाल अजित पवार यांनी करत देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं. आता कंठ फुटला या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले 9 वर्ष निवडणूक झाली नाही तर कंठ कसा फुटणार? असंही ते यावेळी म्हणाले.
महेश लांडगे यांच्याबाबत अजित पवार म्हणतात, तो खूप मोठा आहे. तो स्वयंपूर्ण आहे,त्याचा बोलवता धनी कोणी नाही. भोसरी मधली लोक स्वयंपूर्ण स्वयंभू असतात. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत बोलताना जोपर्यत देवभाऊं मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं म्हटलं. लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी करायचे आहे. 50 लाख लखपती दीदी झल्यात येत्या काळात 1 कोटी लखपती दीदी करणार असं फडणवीस म्हणाले.
