Download App

पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होताच, सोशल मीडियावर चर्चांना उधाण…

Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding Card: पुलकित सम्राट (Pulkit Samrat ) आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda ) हे बॉलीवूडमधील (Bollywood) गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. काळानुसार त्यांचे नाते अधिक घट्ट होत आहे. पुलकित आणि क्रिती खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.


क्रिती आणि पुलकित लवकरच लग्न करणार असून त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल होत आहे. हे कार्ड पाहिल्यानंतर चाहते खूप खुश झाले आहेत आणि या जोडप्याला वधू-वर बनण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सर्वत्र लग्नाच्या पत्रिकेची जोरदार चर्चा होत आहे.

क्रिती-पुलकितच्या लग्नपत्रिकेबद्दल बोलायचे झाले तर त्यात प्रेम, संगीत आणि सुंदर दृश्य दिसत आहे. क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या लग्नपत्रिकेबद्दल बोलताना दोघेजण खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. घराघरातच जणू काही देखावा बनवला आहे. पुलकित हातात गिटार घेऊन बाल्कनीत बसला आहे आणि त्याच्यासोबत क्रितीही बसलीय. कार्डवर लिहिले आहे की, माझ्या लोकांसह उत्सव साजरा करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.

‘या’ दिवशी विवाहसोहळा होणार: पुलकित आणि क्रितीने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर हे जोडपे 13 मार्चला सात फेरे घेणार आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी तारखेबाबत मौन बाळगले आहे. काही वेळापूर्वी पुलकितसोबतचा एक फोटो शेअर करताना क्रितीने मार्चमध्ये लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे.

रिलीज आधीच Shaitaan हाऊसफुल्ल? आतापर्यंत झालं इतकं अँडवान्स बुकींग

क्रिती आणि पुलकितची प्रेमकहाणी अनीज बज्मीच्या पागलपंती या चित्रपटापासून सुरू झाली होती. चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान क्रितीने पुलकितला डेट करत असल्याची पुष्टी केली होती. नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.

follow us

वेब स्टोरीज