Download App

Pushpa 2 : रिलीज आधीच पुष्पा 2 ची बक्कळ कमाई, बाहुबली 2, आरआरआरचंही रेकॉर्ड तोडलं

Pushpa 2 broked record of Bahubali 2 and RRR : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise – Part 1) या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Pushpa 2 Teaser Out) पुष्पा चित्रपटात श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांना चाहत्यांची मने जिंकली.

त्यानंतर आता चाहते पुष्पा 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या पुष्पा-2 चित्रपटाच्या या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन ‘अब रुल पुष्पा का’ हा डायलॉग म्हणत असल्याचा दिसून आला. मात्र अद्याप हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बक्कळ कामाई केली आहे. यामुळे या चित्रपटाने थेट बाहुबली 2, आरआरआरचंही रेकॉर्ड तोडलं आहे. हे पैसे चित्रपटाने त्यांच्या राइट्समधून कमावले आहेत. कारण या चित्रपटाचे ऑडिओ राइट्स तब्बल 65 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्याने ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली 2, आरआरआरचंही रेकॉर्ड तोडलं आहे.

Rajeshwari Kharat : जब्या उगाच काळी चिमणी शोधत नव्हता

पुष्पा-2 मध्ये काही बॉलिवूडमधील कलाकार देखील काम करणार आहेत, असं सांगितले जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. दिग्दर्शक सुकुमार यांचा हा पुष्पा द राइज (Pushpa: The Rise – Part 1) चित्रपट २०२१ मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला.

आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्रीवल्ली, सामी सामी, ओ अंटवा या गाण्यांना चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.

Tags

follow us