Pushpa 2 New Poster: फहाद फासिलच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा-2’ चं नवं पोस्टर प्रदर्शित !

Pushpa 2 New Poster: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा-2’ या सिनेमामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा सिनेमाच्या टीमनं […]

Pushpa 2 New Poster

Pushpa 2 New Poster

Pushpa 2 New Poster: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा-2’ या सिनेमामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा सिनेमाच्या टीमनं चाहत्यांना एक मोठं गिफ्ट देण्यात आले आहे.


नुकताच सोशल मीडियावर पुष्पा-2 या सिनेमातील भंवर सिंह शेखावत या भूमिकेच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. भंवर सिंह शेखावत ही भूमिका फहाद फासिल हा साकारत असल्याचे पाहायला मिळणार आहे. फहाद फासिलच्या भंवर सिंह शेखावत या मुख्य भूमिकेच्या लूकचा फोटो पुष्पा मुव्ही या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रदर्शित करण्यात आला आहे.

तसेच या फोटोला कॅप्शन देखील देण्यात आले आहे, ‘Pushpa2 The Rule च्या टीमकडून फहाद फासिलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, भंवर सिंग शेखावत सर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे.’ पुष्पा-2 च्या या नव्या आणि हटक्या पोस्टरमधील फहाद फासिलच्या या लूकनं चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळत आहे. ‘कायथुम दुरथ’ या सिनेमामधून फहादनं अभिनय क्षेत्रामध्ये चांगलीच एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळालं होत. त्यानं ‘सी यू सून’, ‘जोजी’ आणि ‘मालिक’ या सिनेमामध्ये काम केले आहे.

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

आता फहादच्या ‘पुष्पा 2’ या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा 2’ द रुल या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे, तर यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. या सिनेमाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा २२ डिसेंबर २०२३ दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. पुष्पा द राइज (Pushpa: The Rise – Part 1) हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. पुष्पा द राइज या सिनेमातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा या गाण्यांना चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली होती. आता पुष्पा 2 या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहेत.

Exit mobile version