Download App

Pushpa 2 OTT : रिलीज आधीच ‘पुष्पा 2’ने कमावले 1200 कोटी? ओटीटीसाठीची डील पक्की!

Pushpa 2 OTT Deal: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2'ची (Pushpa 2 OTT Deal) आतुरतेने वाट पाहत आहेत.

Pushpa 2 OTT Deal: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Pushpa 2 OTT ) ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुनचा ॲक्शन अवतार पाहून चाहतेही वेडे झाले आहेत. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नवे रेकॉर्ड बनवेल असा निर्मात्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, पुष्पा 2ने (Pushpa 2 ) रिलीजपूर्वी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.


ओटीटीला विकला गेला

ओटीटी प्लेच्या रिपोर्टनुसार नेटफिलिक्सने Pushpa 2 चे ओटीटी अधिकार 275 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. साउथ चित्रपटासाठी ओटीटीवर ही मोठी रक्कम आहे. केवळ ओटीटीवरच नाही तर टीव्हीवर सॅटेलाइट रिलीझसाठीही निर्मात्यांनी ‘पुष्पा 2’च्या सॅटेलाइट डीलर्सकडून 450 कोटी रुपये कमावले आहेत.

पुष्पा 2 ओटीटीवर कधी रिलीज होत आहे?

जरी नेटफिलिक्सने ‘पुष्पा 2’चे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत. मात्र अल्लू अर्जुनचा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार हे अद्याप ठरलेले नाही. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनंतरच ओटीटीवर चित्रपट येतो. पण पुष्पा 2 च्या बंपर कमाईच्या अपेक्षेमुळे तो ओटीटीवर उशीरा प्रदर्शित होऊ शकतो.

पुष्पा 2 वितरण हक्क

रिपोर्ट्सनुसार ‘पुष्पा 2’च्या हिंदी आवृत्तीच्या वितरणासाठी 200 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांनी उत्तर भारतात चित्रपट वितरणासाठी हा करार केला आहे. तर दक्षिणेत चित्रपटाच्या वितरणासाठी 270 कोटी रुपये आणि परदेशी बाजारात 100 कोटी रुपये किंवा त्याहून अधिकचा करार झाला आहे. एकूणच, थिएटर रिलीजसाठी 570 कोटी रुपयांचा करार आधीच झाला आहे.

पुष्पा 2 चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होणार आहे?

अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट 15 ऑगस्टला 2 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी अजय देवगणचा सिंघम अगेनही याच तारखेला रिलीज होणार होता, मात्र नंतर चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अशा परिस्थितीत आता ‘पुष्पा 2’ समोर कोणताही मोठा चित्रपट नाही.

Aparshakti Khurana: अभिनेता अपारशक्ती खुराणाचा भन्नाट वर्कआऊटचा व्हिडिओ पाहिलंत का?

ओटीटीवर पुष्पा किती विकली गेली

अल्लू अर्जुनच्या पुष्पाविषयी सांगायचे तर, ओटीटी प्लेनुसार, त्याच्या पहिल्या भागाचे हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने 30 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. अशा परिस्थितीत पुष्पा 2 साठी ओटीटीवर एक अतिशय महागडी आणि मजबूत डील करण्यात आली आहे. पुष्पाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुन व्यतिरिक्त यात रश्मिका मंदान्ना आणि फहाद फाजील मुख्य भूमिकेत होते.

follow us

वेब स्टोरीज