Download App

Pushpa 2 : या तारखेला रिलीज होणार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 ! किंग खानच्या सिनेमाशी होणार टक्कर

  • Written By: Last Updated:

Pushpa 2 Release Date: अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ 2021 साली जेव्हा रिलीज झाला होता, तेव्हा खूपच मोठा धमाका झाला होता. आणि यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची वाट सर्वच चाहते बघत आहेत. अधिकृतरित्या ‘पुष्पा २’ (Pushpa 2) ची घोषणा कधीच करण्यात आली आहे. गेल्या काही दिवस अगोदर निर्मात्यांनी पुष्पा २ चा एक टीझर व्हिडीओ आणि अल्लू अर्जूनचा एक पोस्टर रिलीज करण्यात आला होता. ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता मोठी शिगेला लागली होती.

टीझर आणि पोस्टर समोर आल्यावर चाहते आता या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. आणि या सिनेमाची रिलीज वाट चाहते बघत आहेत. अधिकृतरित्या पुष्पा २ ची रिलीज डेट समोर आली नाही, पण काही मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यामध्ये हा सिनेमा रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

अल्लू अर्जूनचा हा सिनेमा २२ डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता रिलीज डेट विषयी मेकर्सनी काही सांगितलेलं नसले, तरी जर या तारखेला ‘पुष्पा २’ रिलीज झाला तर किंग खानच्या ‘डंकी’ सिनेमाशी ‘पुष्पा २’ ची टक्कर होणार असल्याचे बघायला मिळणार आहे. ‘डंकी’ सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीचं आहे. ‘डंकी’ देखील डिसेंबर मध्ये रिलीज होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

‘The Kerala Story’ वरून सुरू असलेल्या वादावर कंगना रनौत पुन्हा उचकली; म्हणाली, “असे चित्रपट…”

या सिनेमामध्ये किंग खान सोबत पहिल्यांदाच तापसी पन्नू चाहत्यांना दिसणार आहे.’पुष्पा २’ विषयी अशी देखील चर्चा आहे की, या सिनेमामध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग देखील दिसून येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की, तो या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसू शकणार आहे.

Tags

follow us