Download App

Pushpa 2 मधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी रॉकस्टार डीएसपी पुन्हा सज्ज

  • Written By: Last Updated:

Pushpa 2 : पुष्पा चित्रपटातून संगीतकार रॉकस्टार डीएसपी या नावाने ओळखले जाणारे देवी श्री प्रसाद आता पुन्हा प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटातून मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे पुष्पाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्याप्रमाणे पुष्पा 2 चे गाणे देखील प्रेक्षकांना भारावून टाकणार हे नक्की.

हुश्श! पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल 28 तास 40 मिनिटांनी सांगता

पुष्पाच्या संगीतासाठी रॉकस्टार डीएसपी यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर आता प्रेक्षकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत. कारण त्यांचं संगीत म्हणजे संपूर्ण चित्रपट बांधून ठेवणारा महत्त्वाचा भाग असतो. त्यांचं संगीत चित्रपटाच्या विषयाला तंतोतंत जुळणार असतं. त्याची मधूरता प्रेक्षकांच्या मनात खोलवर रूजते. त्यांना चित्रपटाशी जोडून ठेवते. त्यामुळे चाहते या चित्रपटाची आणि गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी भरती, १० ऑक्टोंबरपर्यंत करता येणार अर्ज

त्यामुळे जशी या चित्रपटाची आणि संगीतकार रॉकस्टार डीएसपी हेच या चित्रपटाला संगीत देणार असल्याचे समजले आहे. तशी प्रेक्षकांना जास्तच उत्सुकता लागली आहे. दरम्यान संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी नुकताचं पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाच्या संगीताचे भरभरून कौतुक केले.

Gujarat Drugs : गुजरात पोलिसांची मोठी कारवाई; 800 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज जप्त

अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका या त्रिकूटाने अभिनीत तो नवा प्रोजेक्ट करणार आहे. विशेषतः रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण यांनी ‘दृश्यम 2’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर आता नवीन काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज