हुश्श! पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल 30 तास 20 मिनिटांनी सांगता

  • Written By: Published:
हुश्श! पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल 30 तास 20 मिनिटांनी सांगता

पुणे : यंदाच्या वर्षी दगडुशेठ गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत संपल्यानंतरदेखील पुण्यातली गणपती विसर्जन मिरवणूक संपण्यास 30 तास 20 मिनिटांचा कालावधी लागला आहे. काल (दि. 28) रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक आज (दि. 29) रोजी दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी संपली आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षी ही मिरणूक 30 तास 20 मिनिटे एवढ्या विक्रमी वेळ सुरू होती. काशेवाडी येथील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणपतीचे विसर्जन 4 वाजून 40 मिनिटांनी करण्यात आले. गतवर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक जवळपास 30 तास चालली होती. त्या तुलनेत यंदाची मिरवणूक 20 मिनिटे उशीराने संपली आहे.

Pune Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणूक पाहणं ठरलं जीवघेणं; चिमुकला जीवाला मुकला…

यंदाच्या वर्षी दगडुशेठ मंडळाने विसर्जन मिरवणुकीत दुपारी 4 वाजता सहभागी होण्याचा निर्यण घेतला होता. त्यानुसार मंडळ गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास विसर्जनाच्या रांगेत लागले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास दगडुशेठ मंडळाचा गणपती अलका चौकात दाखल झाला आणि 8 वाजून 50 मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावार गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले. म्हणजेच यंदाच्या वर्षी दगडुशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक विक्रमी अशा 5 तासातचं संपली.

दगडुशेठ मंडळ यंदा विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी झाल्याने मिरवणूक लवकर संपेल असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर विसर्जसाठी रांगेत लागलेल्या मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी यासह अन्य मंडळांच्या मिरवणुका उशिरा सुरू झाल्या. यामुळे यंदा वेळेत मिरवणूक संपवण्याचा अंदाज साफ चुकल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मोठी बातमी : बारामती ॲग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करू नका; HC चा रोहित पवारांना दिलासा

विसर्जन मिरवणुकीत भाविकांची तोबा गर्दी 

पुण्यातील गणपती उत्सव आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी देश आणि राज्यभरातून लाखो नागरिक सहभागी होत असतात. याहीवर्षी गपणतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आदी भागात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

शब्द पाळत दगडुशेठ मंडळाने जिंकली सर्वांची मने

दरवर्षी दगडुशेठ मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्रीच्या सुमारास लागत असे. मात्र, गेल्या वर्षी झालेला विलंब लक्षात घेता यावर्षी मंडळाकडून विसर्जनाच्या दिवशी गणपती चार वाजता लागेल असे जाहीर करण्यात आले. अनेकांनी यावर असे होणे शक्य नाही. हे नियोजन प्रत्यक्षात उतरवणे शक्य नसल्याचा दावा केला. मात्र, मंडळाने दिलेला शब्द खरा करून दाखवला. एरवी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास अलका चौकात येणारा दगडुशेठचा गणपती यंदा मात्र, रात्री आठच्या सुमारासच अलका चौकात दाखल झाला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तर, मंडळाने दिलेला शब्द पाळल्यामुळे लाखो पुणेकरांची मने जिंकण्यात मंडळाने बाजी मारल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

नाशिकच्या गणेश विसर्जनाला गालबोट, सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू

मानाच्या गणपतींचे विसर्जन कधी झाले

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला गुरूवारी (दि.28) सकाळी 10 वाजण्याच्यासुमारास उत्साहात सुरूवात झाली. त्यानंतर लक्ष्मी रोडवर लाखो भाविकांनी आनंदाने गणपती बाप्पांचे स्वागत केले. त्यानंतर मानाचा पहिला गणपीत कसबा गणपतीचे दुपारी 4.35 वाजण्याच्या सुमारासा विसर्जन करण्यात आले. मानाचा दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली आणि संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास या मंडळ्च्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन संध्याकाळी 5.55 वाजता करण्यात आले. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे विसर्जन सायंकळी 6.32 वाजता तर, पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पूर्ण झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube