नाशिकच्या गणेश विसर्जनाला गालबोट, सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या गणेश विसर्जनाला गालबोट, सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Ganesh festival : राज्यभरात काल गणेश विसर्जनाच (Nashik Ganesh festival) उत्साह पाहायला मिळाला. यादरम्यान विसर्जन करताना नाशिकमध्ये (Nashik News) अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या चार घटनांत सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरातील (Ganesh Visarjan) काही मुर्तीचे विसर्जन दीड दिवसांत झाले तर काही ठिकाणी तीन दिवसांत विसर्जन झाले. काल शहरातील सर्व गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. मात्र विसर्जनादरम्यान शहर परिसरात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास गोदा घाटावर तीन गणेश भक्त बुडाले. त्यांचा शोध सकाळी लागला. गोदावरी नदीत तीन युवकांचे मृतदेह आढळले. तर आणखी एक गणेश भक्त बुडाल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे वडनेर दुमाला येथील वालदेवी नदीपात्रामध्ये एकजण गणपती विसर्जन दरम्यान पाण्यात बुडाला होता.

Ahmednagar शहरात पाणीबाणी; महिलांनी थेट मनपाच्या अधिकाऱ्यांना घेरलं…

त्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. चेहडी येथील संगमेश्वर नदीपात्रात सिन्नर फाटा परिसरात राहणाऱ्या दोघांचा गणेश विसर्जन करत असताना बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रात्री दहा वाजेच्या सुमारास अंबड परिसरात टॅक्टरखाली सापडून सहा वर्षीय मुलाचा बळी गेला. अशा एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?

गणेश विसर्जनदरम्यान सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास गोदाकाठावर गर्दी झाली होती. याच वेळी विसर्जनसाठी आलेले तीन जण बुडाले. यात मुदूराम ओम प्रकाश, राहुल सत्यनारायण मोरया, सोहनकुमार भगवती प्रसाद सोनकर या तिघांछी ओळख पटली असून हे तिघेही उत्तर प्रदेशातील आहेत.

तर चेहडी संगमावर दोघांचा गणेश विसर्जन करत असताना बुडून मृत्यू झाला. तर वालदेवी धरण परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. अंबड परिसरात मिरवणूक सुरु असताना मिरणणूक सुरु असताना ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुद्रा राजू भगत हा सहा वर्षीय मुलगा ठार झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube