Raavrambha Team at Raigad: सध्या मराठी सिनेमांमध्ये नवनवीन सिनेमांची मांदियाळी आहे. अनेक विषयांवर आधारित वेगवगळे सिनेमे मराठी मनोरंजन विश्वामध्ये लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत. अशाच एका सिनेमाची चर्चा सध्या जोर धरत आहे ती म्हणजे रावरंभा.हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि (Chhatrapati) छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्या सर्वाना माहित आहेत.
आता रावरंभाच्या निमित्ताने अशीच एक ऐतिहासिक कहाणी चाहत्यांना बघायला मिळणार आहे. रावरंभा सिनेमाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरु आहे. नुकतीच सिनेमाची टीम रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी गेल्याची चर्चा रंगत आहे. त्यावेळी सिनेमाच्या टीमने महाराजांच्या समाधी स्थळासमोर आपल्या सिनेमाचे पोस्टर लाँच केले आहे.
यावेळी सिनेमाचे प्रमुख कलाकार ओम भुतकर आणि मोनालिसा बागल उपस्थित होते. यावेळी सिनेमाच्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे अभिवादन केले आहे. तर अनेकदा रणभूमीवर समशेर फिरवून शत्रूंना नामोहरम करणाऱ्या योद्धांची कथा आपल्याला माहित राहणार आहे. पण या वीरांच्या पाठीमागे अगदी झाडाच्या सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट आपल्याला माहिती राहणार आहे.
अनेक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले, तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात आली. स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी चाहत्यांना ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक सिनेमातून २६ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. रावरंभाची सिनेमाची गाणी गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तसेच या गाण्यांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा आवाज मिळाला आहे.
The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास
तसेच संगीतकार अमितराज यांनी यामधील गीते संगीतबद्ध केली आहेत. व्हिडिओ पॅलेसकडे सिनेमाच्या गीताचे हक्क आहेत. ‘रावरंभा’ सिनेमाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे. सर्व चाहत्यांच्या भेटीला १२ मे पासून ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.