Radhika Bhide : सध्याचा भारतभर गाजणारा , तरूणाईचा लाडका मराठमोळा आवाज म्हणजे ‘मन धावतंया’ फेम राधिका भिडे! याच राधिकाने गायलेलं पहिलंवहिलं मराठी चित्रपट गीत “हो आई!” सध्या चांगलंच व्हायरल होतंय. ‘उत्तर ‘ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या या प्रमोशन गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि ‘तू आहेस म्हणून मी आहे’ ही भावना सोप्या शब्दात आणि गोड चालीत उलगडली आहे. ‘उत्तर’ चित्रपटाच्या टीजरने रसिकांची उत्सुकता वाढली असतानाच “ हो आई” हे गाणं ती आतुरता अधिकच वाढवणारं आहे.
या गाण्याचे बोल सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांचे असून यापूर्वी अमितराज–क्षितिज पटवर्धन ह्या जोडीने ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं’ आणि ‘तुला जपणार आहे’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. नात्यांचे बंध उलगडणारं, त्यांचं हळूवारपण जपणारं , अमितराज- क्षितिज पटवर्धन या जोडीचं ‘हो आई!’ हे नवं गाणं ‘उत्तर’ या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आपल्या सर्वांच्याच मनातली आईबद्दलची भावना व्यक्त करणारं राधिकाच्या सुमधुर सुरांनी सजलेलं तरल आणि संवेदनशील असं हे गाणं प्रत्येकाला आपल्या आईला ‘थँक यू’ म्हणण्याची संधी देणारं निश्चितच आहे.
मेंढवा जमीन व्यवहार प्रकरण रद्द करणारे अजित पवार कोण? अंजली दमानिया आक्रमक
झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या ‘उत्तर’या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर व जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 12 डिसेंबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
